Lokmat Sakhi >Food > Home gardening : फोडणीसाठी ताजी हिरवीगार मिरची वापरा, चव नक्की बदलेल! कशी, त्यासाठीच तर ही ट्रिक

Home gardening : फोडणीसाठी ताजी हिरवीगार मिरची वापरा, चव नक्की बदलेल! कशी, त्यासाठीच तर ही ट्रिक

Home gardening ideas : मिरचीची लागवड जितक्या सहजपणे केली जाते तितकीच त्याची काळजीही घ्यावी लागते. मिरचीच्या शेतीसाठी कोणत्या प्रकारच्या मातीची आवश्यकता आहे किंवा कोणत्या प्रकारचे खत आवश्यक आहे यासारख्या काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 04:03 PM2021-07-26T16:03:56+5:302021-07-26T16:43:27+5:30

Home gardening ideas : मिरचीची लागवड जितक्या सहजपणे केली जाते तितकीच त्याची काळजीही घ्यावी लागते. मिरचीच्या शेतीसाठी कोणत्या प्रकारच्या मातीची आवश्यकता आहे किंवा कोणत्या प्रकारचे खत आवश्यक आहे यासारख्या काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. 

Home gardening ideas : How to get more chillies on plant | Home gardening : फोडणीसाठी ताजी हिरवीगार मिरची वापरा, चव नक्की बदलेल! कशी, त्यासाठीच तर ही ट्रिक

Home gardening : फोडणीसाठी ताजी हिरवीगार मिरची वापरा, चव नक्की बदलेल! कशी, त्यासाठीच तर ही ट्रिक

Highlightsमिरच्यांसाठी फार महाग सेंद्रिय खते खरेदी करण्याची गरज नाही. हे झाड घरगुती खतासह उत्कृष्ट वाढेल.जेव्हा मिरचीची झाडे लहान असतात तेव्हा त्यांना किड्यांचा रोग लवकर होतो. अशा स्थितीत ते झाडाचे सर्व पोषण संपवतील आणि आपल्या झाडाला कधीही मिरच्या येणार नाहीत. यासाठी एक छोटी युक्ती खूप प्रभावी ठरू  शकते.

 सहज उगवल्या जात असलेल्या पदार्थांमध्ये मिरचीचा समावेश होतो. मिरचीच्या झाडाला फक्त चांगल्या बियांची गरज असते. काही दिवसात खूप चांगलं उत्पादन मिरचीच्या शेतीतून मिळतं. अनेकांचा तक्रार असते की मिरचीचं रोपटं व्यवस्थित वाढत नाही. काही ट्रिक्सचा वापर  करून तुम्ही घरीच मिरचीचं रोपटं लावू शकता.  घराच्या गच्चीवर, किंवा बाल्कनीत लहानशी जागा असेल तरी तुम्ही हे झाड लावू शकता. मिरचीची लागवड जितक्या सहजपणे केली जाते तितकीच त्याची काळजीही घ्यावी लागते. मिरचीच्या शेतीसाठी कोणत्या प्रकारच्या मातीची आवश्यकता आहे किंवा कोणत्या प्रकारचे खत आवश्यक आहे यासारख्या काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. 

१) होममेड खतं चांगला पर्याय 

मिरच्यांसाठी फार महाग सेंद्रिय खते खरेदी करण्याची गरज नाही. हे झाड घरगुती खतासह उत्कृष्ट वाढेल. आपल्याला फक्त मॅग्नेशियम, पोटॅशियम समृद्ध खत बनविणं आवश्यक आहे. खत तयार करण्यासाठी तुम्हाला  ४ ते ५ वस्तूंची गरज भासेल.

साहित्य - वापरलेली चहा पावडर, अंड्याचं साल, कांद्याचे साल, नारळाचा तुकडा, 1/2 चमचा मिरची पावडर
हे सर्व साहित्य आपल्या खतासाठी उपयुक्त ठरू शकतात. चहाची पाने, अंड्याचे कवच, कांद्याची साले नेहमीच सम प्रमाणात घ्या. त्यांना वाळवा आणि नंतर ते कोरडे झाल्यावर बारीक करा. आता या मिश्रणामध्ये थोडासा नारळ आणि तिखट घाला. हे लक्षात ठेवा मिरची पावडर 1/2 टीस्पून (250 ग्रॅम खतसाठी) असावी. अन्यथा आपण वगळूही शकता.

पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यासाठी  तुम्ही सुकलेल्या केळ्याच्या सालीचा वापर करू शकता. या सर्व वस्तू एकत्र करून पावडर तयार करून घ्या आणि १५ दिवसातून एकदा झाडावर वापरा. खत घालताना, माती थोडीशी खणून घ्या जेणेकरून माती गोठणार नाही. पोषक तत्व वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोचवा. हे फक्त 1 चमचे वापरावे लागेल. खत आपल्या रोपांना लवकर मिरच्या देण्यास खूप उपयुक्त ठरू  शकतं.

२) किड्यांपासून बचाव करायला हवा

जेव्हा मिरचीची झाडे लहान असतात तेव्हा त्यांना किड्यांचा रोग लवकर होतो. अशा स्थितीत ते झाडाचे सर्व पोषण संपवतील आणि आपल्या झाडाला कधीही मिरच्या येणार नाहीत. यासाठी एक छोटी युक्ती खूप प्रभावी ठरू  शकते. वनस्पतींना कीटकांपासून वाचवण्यासाठी आपण या दोन पद्धती वापरू शकता.

शॅम्पू - २ लिटर पाण्यात १ चमचा शॅम्पू घालून झाडावर शिंपडा. अर्ध्या तासानं पुन्हा साध्या पाण्याचा फवारा मारा. 

तांदळाचे पाणी - १ दिवस आधी भिवजलेल्या तांदळाचे पाणी तुम्ही वापरू शकता. स्प्रे बॉटलमध्ये भरून झाडावर शिंपडा. या पाण्यामुळे  पोषण मिळेल तसंच किडे दूर होण्यास मदत होईल. 

३) पाणी घालताना या गोष्टींची काळजी  घ्या

मिरचीचं झाड लावत असताना खूप लोक चुका करतात. त्यामुळे चांगली वाढ होत नाही. मिरचीच्या झाडाला माती, सुर्यप्रकाश आणि उन्हाची आवश्यकता असते. या झाडाला जास्त थंडीचं वातावरण अनुकूल नसते.

४ ते ५ आठवड्यांच्या आत  ट्रिमिंग करणं गरजेचं असतं. त्यामुळे झाड व्यवस्थित वाढतं.  जास्त पाणी घालू नका दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा पाणी घातल्यानं झाडाची व्यवस्थित वाढ होत नाही.  

तुमच्याकडे सुकलेल्या मिरच्या असतील तर एका टिश्यू पेपरमध्ये बांधून त्यावर पाण्याचा स्प्रे करा मग वापरा. ओल्या मिरचीच्या बिया तुम्ही थेट वापरू शकता.

Web Title: Home gardening ideas : How to get more chillies on plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.