Join us  

ना लाटणे- ना तेलाचा एक थेंब, तिप्पट फुलणारे मैद्याचे पापड करण्याची सोपी कृती; टिकतील महिनाभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2024 12:51 PM

Home Made Maida Papad Recipe, Check out Recipe : कपभर मैदा - ८ कप पाणी; कुरकुरीत मैद्याचे पापड एकदा करून पाहाच..

उन्हाळ्यात वाळवणाचे पदार्थ आवर्जून केले जातात (Maida Papad). पापड, कुरडई, पळी पापड, वाळवणाची चकली यासह विविध पदार्थ केले जाते (Easy Papad Recipe). डाळ, तांदूळ, पोहे, साबुदाणा आणि बटाट्याचे आपण पापड खाल्लेच असतील. पण कधी मैद्याचे पापड खाऊन पाहिलं आहे का? मैद्याच्या पोळ्या, मैद्याची चकली, मैद्याची बर्फी आपण खाल्लीच असेल.

पण यंदा मैद्याचे पापड करून पाहा. काही वेळेला पापड लाटायला आणि चकली पाडण्यात गृहिणींना कंटाळा येतो. जर आपल्याला झटपट आणि कमी वेळात चविष्ट पापड तयार करायचे असतील तर, मैद्याचे पापड हे बेस्ट ऑप्शन आहे. कुरकुरीत पापड बनतील १५ मिनिटात, टिकतील महिनाभर(Home Made Maida Papad Recipe, Check out Recipe).

मैद्याचे पापड करण्यासाठी लागणारं साहित्य

मैदा

कलौंजी

१६ वर्षांची 'लापता लेडीज' मधली अभिनेत्री बनली 'स्टार', सोशल मीडियात १० मिलियन फॉलोअर्स, 'ती' नक्की कोण?

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये एक चाळणी ठेवा, त्यात एक मोठा कप मैदा घाला, आणि चाळून घ्या. नंतर त्यात एक चमचा मीठ, एक चमचा कलौंजी आणि दोन कप पाणी घालून चमच्याने मिक्स करा.

न वाफवता करा क्रिस्पी अळूवडी, गुजराथी पद्धतीच्या आंबट-गोड अळूवडीची खास पारंपरिक रेसिपी

आता गॅसवर एक जाड तळाचं भांडं ठेवा. भांडं गरम झाल्यानंतर त्यात ६ कप पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बॅटर ओतून चमच्याने सतत मिक्स करत राहा.

बॅटरला घट्टपणा आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. बॅटर घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. नंतर प्लास्टिक कव्हरवर चमचाभर बॅटर ओतून पसरवा. उन्हात २ दिवसांसाठी हे पापड वाळत घाला. २ दिवसानंतर तयार मैदा पापड एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेलात तळून खा. हे पापड महिनाभर आरामात टिकतात. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स