Lokmat Sakhi >Food > बाळासाठी महागडी फूड पावडर कशाला हवी? ‘हा' घरगुती पौष्टिक पदार्थ खाऊ घाला- बघा रेसिपी

बाळासाठी महागडी फूड पावडर कशाला हवी? ‘हा' घरगुती पौष्टिक पदार्थ खाऊ घाला- बघा रेसिपी

How To Make Home Made Instant Food Powder For Kids: १ वर्षापेक्षा लहान मुलांसाठी कशाला विकत घेता बाजारात मिळणारे रेडी टू इट पदार्थ- त्यापेक्षा ही एक पावडर घरीच करून ठेवा.. (homemade cerelac for kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 06:23 PM2024-10-11T18:23:23+5:302024-10-11T18:25:09+5:30

How To Make Home Made Instant Food Powder For Kids: १ वर्षापेक्षा लहान मुलांसाठी कशाला विकत घेता बाजारात मिळणारे रेडी टू इट पदार्थ- त्यापेक्षा ही एक पावडर घरीच करून ठेवा.. (homemade cerelac for kids)

homemade cerelac for kids, how to make home made instant food powder for kids, best food for kids under 1 year while travelling | बाळासाठी महागडी फूड पावडर कशाला हवी? ‘हा' घरगुती पौष्टिक पदार्थ खाऊ घाला- बघा रेसिपी

बाळासाठी महागडी फूड पावडर कशाला हवी? ‘हा' घरगुती पौष्टिक पदार्थ खाऊ घाला- बघा रेसिपी

Highlightsप्रवासातही ती पावडर तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.बाळासाठी घरच्याघरी रेडी टू इट पद्धतीची फूड पावडर कशी तयार करायची ते पाहा..

बाळ ६ महिन्याचं झालं की त्याला वरचा आहार देण्यास सुरुवात करतात. सुरुवातीला काही दिवस अगदी पाण्यासारखी पातळ पेज दिली जाते. त्यानंतर मग हळूहळू थोडे घट्ट पदार्थ दिले जातात. हल्ली तर बाळ ७- ८ महिन्याचं झालं की त्याच्यासाठी बाजारात वाटेल तेवढ्या इंस्टंट फूड पावडर मिळतात. कधी कधी आईला वेळ नसेल किंवा प्रवासाला जायचं असेल तर बऱ्याच महिला या पावडर विकत घेऊन बाळाला देतात. पण त्यापेक्षा असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही घरी तयार करून घेऊ शकता आणि अवघ्या काही मिनिटांत त्याची पेज तयार करून बाळाला देऊ शकता (How To Make Home Made Instant Food Powder For Kids?). अगदी प्रवासातही ती पावडर तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. म्हणूनच बाळासाठी घरच्याघरी रेडी टू इट पद्धतीची फूड पावडर कशी तयार करायची ते पाहा..(homemade cerelac for kids)

 

बाळासाठी रेडी टू इट फूड पावडर कशी तयार करायची?

बाळासाठी बाजारात मिळते त्यापेक्षाही पौष्टिक अशी रेडी टू इट फूड पावडर कशी तयार करायची, याची  डॉ. रस्तोगी यांनी सांगितलेली रेसिपी tuktukcooks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

फक्त १० रुपयांत लाकडी फर्निचर चमकेल अगदी पॉलिश केल्यासारखंच! पाहा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी खास ट्रिक...

साहित्य

१ कप तांदूळ

पाव कप मसूर डाळ

पाव कप मुग डाळ

अर्धा कप मखाना

८ ते १० बदाम आणि काजू

 

कृती 

१. सगळ्यात आधी तांदूळ, मसूर डाळ आणि मूग डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

२. त्यानंतर ते एका कपड्यावर पसरून ठेवा आणि थोडे सुकू द्या. सुकल्यानंतर ते कढईमध्ये टाका आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.

कुंडीतल्या रोपांना घाला ४ प्रकारचं पाणी, सुकलेली रोपेही होतील टवटवीत आणि बहरतील फुलांनी

३. त्यानंतर त्याच कढईमध्ये मखाना, बदाम, काजू  भाजून घ्या. तुम्ही त्यामध्ये अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया असे पौष्टिक घटकही घालू शकता.

४. भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्सरमधून काढून त्याची बारीक पावडर करा. ही पावडर एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवल्यास २ महिने चांगली टिकते.


 

५. जेव्हा बाळाला तुम्हाला खाऊ घालायचं असेल तेव्हा एक चमचा पावडर एक कप पाण्यात मिसळून गॅसवर गरम करायला ठेवा.

दसरा- दिवाळीत दारासाठी तोरण कसं तयार करावं? ५ सुंदर डिझाईन्स, करायला सोपे- दिसायला आकर्षक

एक- दोन मिनिटांतच पाण्याला उकळी येऊन छान पेज तयार होईल. यात थोडं मीठ आणि साजूक तूप घालून बाळाला खाऊ घाला. लहान बाळं आवडीने खातील. 


 

Web Title: homemade cerelac for kids, how to make home made instant food powder for kids, best food for kids under 1 year while travelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.