Join us  

नारळाचं तेल घरीच करण्याची सोपी पद्धत; मिळेल शुद्ध तेल-भेसळीचं भय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 1:18 PM

Homemade Coconut Oil Recipe : शुद्ध खोबरेल तेल केस आणि त्वचा दोघांसाठी इतके चांगले आहे की जर तुम्हाला त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण किंवा कोरडेपणा असेल तर ते देखील बरे होऊ शकते. (How to make coconut oil at home)

घरात स्वयंपाकात वापरण्यासाठी बरेच नारळ असले तरीही नारळाचे तेल कोणीही घरी बनवून पाहत नाही.  बाजारातील खोबरेल तेलात अनेक प्रकारची रसायने असू शकतात. (How to make Coconut Oil at home for cooking) एक्स्ट्रा व्हर्जिन नारळ तेल किती शुद्ध आहे याचा अंदाज लावता येत नाही. शुद्ध खोबरेल तेल केस आणि त्वचा दोघांसाठी इतके चांगले आहे की जर तुम्हाला त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण किंवा कोरडेपणा असेल तर ते देखील बरे होऊ शकते. (How to make coconut oil at home)

म्हणूनच तुम्ही वापरत असलेलं खोबऱ्याचं तेल अस्सल आणि चांगल्या बनावटीचं असावं. घरच्याघरी खोबऱ्याच्या वाट्यांपासून नारळाचं तेल बनवणं अगदी सोप्पयं. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही फक्त सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

घरच्याघरी नारळाचं तेल कसं बनवायचं?

घरी नारळाचे  तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी नारळ फोडून त्यातलं पाणी काढून घ्या. मग नारळाचे सुरीच्या साहाय्यानं पातळ तुकडे करा.  हे तुकडे ब्लेंडरमध्ये घालून बारीक दळून घ्या. दळल्यानंतर खोबऱ्याच्या चटणीप्रमाणे टेक्चर दिसेल. एका स्वच्छ कापडाच्या साहाय्यानं या मिश्रणातून नारळाचं दूध गाळून घ्या आणि नंतर कापडातून चोथा बाहेर काढा.  परत मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर हे पातळ मिश्रण फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

जेवताना तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा लसणाची चमचमीत चटणी; १५ दिवस टिकणारी झटपट चटणी

७ ते ८ तासात हे मिश्रण सेट झाल्यानतंर एक गरम कढईत हे मिश्रण घाला. उकळी फुटल्यानंतर हळूहळू या मिश्रणातून तेल बाहेर पडण्याला सुरूवात होईल. तेल गाळणीच्या साहाय्यानं काचेच्या बरणीत काढून घ्या. खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत तळून घ्या आणि उरलेलं तेल गाळून घ्या.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न