Lokmat Sakhi >Food > विकतसारखे दही घरात तयार होते? एक जबरदस्त टीप; पाणी न सुटता - गोडसर दही होईल तयार..

विकतसारखे दही घरात तयार होते? एक जबरदस्त टीप; पाणी न सुटता - गोडसर दही होईल तयार..

Homemade Curd Recipe - Tips & Tricks To Make Curd at Home : कापता येईल इतके घट्ट दही घरीच तयार होईल, पाहा सोपी टीप..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 05:51 PM2024-03-11T17:51:42+5:302024-03-11T17:56:06+5:30

Homemade Curd Recipe - Tips & Tricks To Make Curd at Home : कापता येईल इतके घट्ट दही घरीच तयार होईल, पाहा सोपी टीप..

Homemade Curd Recipe - Tips & Tricks To Make Curd at Home | विकतसारखे दही घरात तयार होते? एक जबरदस्त टीप; पाणी न सुटता - गोडसर दही होईल तयार..

विकतसारखे दही घरात तयार होते? एक जबरदस्त टीप; पाणी न सुटता - गोडसर दही होईल तयार..

उन्हाळा सुरु झाल्यानंतर घरात दही लावण्यात येते. दही खाण्याचे प्रमाणही वाढते. उन्हाळ्यात दही, ताक आवर्जून खाल्ले जाते. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण घरात दही लावताना विकतसारखे घट्ट तयार होत नाही. शिवाय घरच्याला दह्याला विकतच्या घट्ट दह्याची सर येत नाही (Kitchen Tips and Tricks). दही लावण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काहींचे घरात दही नीट लागत नाही (Cooking Tips). त्यात पाणी जमा होते, किंवा जास्त आंबट होते. त्यामुळे आपण बऱ्याचदा विकतचे दही आणतो.

जर आपल्याला बाजारातून विकतचे दही आणायचे नसेल तर, घरात दही लावताना काही टिप्स वापरून पाहा (Curd Recipe). या टिप्सच्या मदतीने कापता येईल इतके घट्ट दही तयार होईल(Homemade Curd Recipe - Tips & Tricks To Make Curd at Home).

दही खाण्याचे फायदे

दही हे पोषक तत्वांचा खजिना आहे. यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, बी २, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे. हे पोषक तत्त्वे हाडांच्या आरोग्यास मजबूती देतात. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे पचनास मदत करतात.

आयर्न-प्रोटीनने परिपूर्ण ग्रीन-ढोकळा कधी खाल्लाय का? कपभर हिरव्या मुगाची टेस्टी-हेल्दी रेसिपी..

घरात विकतसारखे दही तयार करण्याची सोपी पद्धत

लागणारं साहित्य

दूध

दही

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर दूध गरम करा, दुधाला उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करा, व दूध थंड होण्यासाठी ठेवा. एका वाटीमध्ये २ चमचे दही घेऊन फेटून घ्या. दह्याला क्रिमी टेक्स्चर आल्यानंतर वाटी एका बाजूला ठेवा.

कपभर तांदुळाची करा हेल्दी-पारंपारिक खीर, चवीला जबरदस्त-बनवायला सोपी; पाहा कृती

एका मडक्याला धुवून घ्या. त्यातून पाणी निथळून घ्या. त्यात फेटलेलं दही ओतून ब्रशने सगळीकडे पसरवा. त्यात कोमट झालेलं दूध ओता. दूध ओतून झाल्यानंतर त्यात एक चमचा फेटलेलं दही घालून मिक्स करा. त्यावर झाकण ६ तासांसाठी ठेवा, व मडकं फ्रिजमध्ये न ठेवता. बाहेरच ठेवा. जेणेकरून दही व्यवस्थित लागेल. अशा प्रकारे घट्टसर दही खाण्यासाठी रेडी. विकतचे आणण्यापेक्षा कापता येईल इतके घट्टसर दही घरीच तयार होईल. 

Web Title: Homemade Curd Recipe - Tips & Tricks To Make Curd at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.