Lokmat Sakhi >Food > विकतची प्रिझर्वेटिव्ह असलेली आलं - लसूण पेस्ट कशाला वापरता? घरी करा पेस्ट ; टिकेल महिनाभर

विकतची प्रिझर्वेटिव्ह असलेली आलं - लसूण पेस्ट कशाला वापरता? घरी करा पेस्ट ; टिकेल महिनाभर

Homemade Ginger Garlic Paste Recipe : आलं - लसूण पेस्ट तयार करण्याची पाहा सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 10:00 AM2024-09-17T10:00:28+5:302024-09-17T11:28:19+5:30

Homemade Ginger Garlic Paste Recipe : आलं - लसूण पेस्ट तयार करण्याची पाहा सोपी कृती

Homemade Ginger Garlic Paste Recipe | विकतची प्रिझर्वेटिव्ह असलेली आलं - लसूण पेस्ट कशाला वापरता? घरी करा पेस्ट ; टिकेल महिनाभर

विकतची प्रिझर्वेटिव्ह असलेली आलं - लसूण पेस्ट कशाला वापरता? घरी करा पेस्ट ; टिकेल महिनाभर

भाजी किंवा डाळ करताना आपण आलं - लसणाची पेस्ट वापरतो (Ginger Garlic Paste). आलं - लसणाच्या पेस्टमुळे पदार्थाची रंगत वाढते, आणि पदार्थ चविष्ट होतो. पण आलं - लसणाच्या पेस्टमध्ये प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण जास्त असते (Food). जे आरोग्यासाठी घातक असते. बाजारातून विकतची पेस्ट घेण्यापेक्षा आपण घरीच आलं - लसणाचा वापर करतो (Cooking Tips).

पण लसूण सोलणे आणि आलं किसून घेणे हे किचकट काम वाटतं. जर आपल्याला विकतची आलं - लसणाची पेस्ट वापरायची नसेल तर, घरातच आलं - लसणाची पेस्ट तयार करून पाहा. आलं - लसूण पेस्टची रेसिपी शेफ पंकज भदौरिया यांनी शेअर केली आहे. आपण ही रेसिपी फॉलो करून आलं - लसूण पेस्ट तयार करू शकता(Homemade Ginger Garlic Paste Recipe).

आलं - लसूण पेस्ट करण्यासाठी लागणारं साहित्य


लसूण

आलं

व्हिनेगर

अंगदुखी - शरीराच्या दुर्गंधीने त्रस्त? अंघोळीच्या पाण्यात मिसळा चमचाभर ' ही ' गोष्ट; राहाल दिवसभर फ्रेश

मीठ

कृती

सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्या. त्यात ६० टक्के लसूण, ४० टक्के आलं, एक टेबलस्पून तेल, एक टेबलस्पून व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ घालून पेस्ट तयार करा. अशा प्रकारे आलं - लसूण पेस्ट रेडी. आपण ही पेस्ट एका हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. यामुळे ही पेस्ट अधिक काळ फ्रेश राहील.   

Web Title: Homemade Ginger Garlic Paste Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.