Join us  

विकतसारखी घट्ट आलं-लसूण पेस्ट घरी करण्याची सोपी पद्धत; १ वर्ष टिकेल-सुगंधही उडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:50 PM

Homemade Ginger Garlic Paste Recipe (Aal Lasnachi Paste Kashi karavi) : केमिकल्सयुक्त आलं-लसणाची पेस्ट वापरण्यापेक्षा घरच्याघरी सोप्या पद्धतीनं तुम्ही ही पेस्ट बनवू शकता. 

स्वयंपाकाची चव वाढवण्यात आलं-लसूण खूप महत्वाचे असते. भाजीत किंवा ग्रेव्हीमध्ये  आलं-लसणाचं वाटण घातलं नाही तर पदार्थ खाल्ल्यासारखा वाटतच नाही. (Kitchen Hacks) रोजच्या स्वंयपाकासाठी  आलं आणि लसणाची पेस्ट बनवणं फार अवघड वाटतं. (Homemade Ginger Garlic Paste Recipe) कारण स्वयंपाक चविष्ट व्हावा असं प्रत्येकाला वाटतं पण पुरेसा वेळ कोणाकडेच नसतो. अशा स्थितीत लोक बाजारातील आलं-लसणाचे तयार पॅकेट्स  वापरतात. केमिकल्सयुक्त आलं-लसणाची पेस्ट वापरण्यापेक्षा घरच्याघरी सोप्या पद्धतीनं तुम्ही ही पेस्ट बनवू शकता.  विकतसारखी घट्ट आलं-लसूण पेस्ट बनवण्याची सोपी पद्धत पाहूया. (Ginger garlic paste Recipe)

 लसणाची पेस्ट कशी करायची? (How to make Garlic Paste at home)

१) सगळ्यात आधी लसणाचे सालं काढून घ्या. लसणाची सालं पटपट काढून होण्यासाठी त्याची मागचा भाग सुरीच्या साहाय्याने कापून घ्या. वरचा भाग काढा यामुळे लसणाचे साल सहज निघतील. लसूण तुम्ही मायक्रोव्हेव्हमध्येही ठेवू शकता.  कारण लसूण गरम झाल्यानंतर सालं सहज निघतील. 

२) जर तुम्हाला लसूण सोलायला जास्त वेळ मिळत नसेल तर जमेल तसे २ ते ३ दिवसात लसूण सोलून तयार ठेवा. तुम्हाला हवे असतील तितके पाव किंवा अर्धा किलो लसूण सोलल्यानंतर  एका मिक्सरच्या भांड्यात सोललेले लसूण काढून घ्या. त्यात २ ते ३ चमचे मीठ घालून झाकण लावून पेस्ट तयार करा.

३) तुम्ही जितकं जास्त मीठ मिसळाल तितके जास्त दिवस ही पेस्ट टिकेल. कारण मीठ प्रिजर्वेटीव्हचे काम करते. तुम्ही यात गरजेनुसार पाणी मिसळू शकता. पण पाणी मिसळल्यास ही पेस्ट तुम्हाला  ३ महिन्यांच्या आत संपवावी लागेल अन्यथा बुरशी लागू शकते किंवा पेस्टचा दुर्गंध येऊ शकतो. जर तुम्ही पाणी मिसळले नाही तर ही पेस्ट वर्षभरही चांगली राहील. बारीक करून झाल्यानंतर ही पेस्ट एका हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. 

दुधावर पराठ्यासारखी घट्ट साय येईल; दूध गरम करताना ५ ट्रिक्स वापरा-दुधावर जाड मलई येईल

आल्याची पेस्ट कशी बनवावी? (How to Make Garlic Paste at Home)

१) तुम्हाला हवं असेल तितके पाव किंवा अर्धा किलो आलं घेऊन स्वच्छ धुवून पुसून मग त्याची सालं काढून घ्या.  मिक्सरच्या  भांड्यात आल्याचे तुकडे घालून त्यात २ ते ३ चमचे मीठ घाला. त्यात जराही पाणी घालू नका. कारण आल्यामध्ये बराच ओलावा असतो.  मीठामुळे पेस्ट लवकर खराब होत नाही.

२) फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर पेस्टचा बर्फ होत नाही. एका हवाबंद डब्यात ही पेस्ट काढून घ्या. तुम्ही फ्रिजरमध्ये ही पेस्ट ठेवू शकता. जेव्हाही कोणतीही भाजी बनवायची असेल तेव्हा तुम्ही ही पेस्ट वापरू शकता. जर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट वेगवेगळी नको असेल तर एका छोट्या डब्यात या दोन्ही पेस्ट एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स