Lokmat Sakhi >Food > दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...

दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...

How to preserve garlic - ginger paste : आलं - लसणाची पेस्ट तयार करताना काही टिप्स वापरल्या तर ही पेस्ट जास्त दिवस टिकवून ठेवता येऊ शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2023 03:20 PM2023-08-12T15:20:10+5:302023-08-12T15:36:50+5:30

How to preserve garlic - ginger paste : आलं - लसणाची पेस्ट तयार करताना काही टिप्स वापरल्या तर ही पेस्ट जास्त दिवस टिकवून ठेवता येऊ शकते...

Homemade Ginger Garlic Paste Recipe-How to Preserve Ginger Garlic Paste for 6 month and tips. | दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...

दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...

आलं - लसणाची पेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव वाढविण्यासाठीचा आवश्यक आणि महत्वाचा जिन्नस होय. आलं, लसूण न वापरता जेवण करणे याची कल्पनाच आपण करु शकत नाही. झणझणीत, रस्सेदार ग्रेव्ही करायच्या म्हटल्या की त्यात आलं - लसूण पाहिजेच. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना जेवणात आलं - लसणाची पेस्ट वापरण्याची सवय असते. एखाद्या दिवशी आलं - लसणाची पेस्ट जेवणात नसेल तर जेवणाला पाहिजे तशी चवच येत नाही. परंतु अनेक वेळा धावपळीत आले लसूण सोलून त्याची पेस्ट बनवायला वेळ नसतो. ज्यामुळे जेवणाची चव आणि मूड दोन्ही खराब होते. अशावेळी आलं - लसणाची पेस्ट तयार करून आपण ती स्टोअर करून ठेवू शकतो. 

बरेच लोक घरात आलं आणि लसूण पेस्ट बनवून ठेवतात. रोजची भाजी बनवायला घेतली की आलं लसणीची पेस्ट तयार असेल तर काम वाचतं आणि वेळही वाचतो. अनेकदा घरात तयार केलेली आलं लसणाची पेस्ट फ्रिजमध्ये साठवून ठेवली की झटपट स्वयंकपाक देखील करता येतो. खरंतर, आलं आणि लसूण पेस्ट बंद पाकिटातील वापरण्यापेक्षा घरीच तयार केलेली उत्तम ठरते आणि बर्‍याच काळासाठी सहजपणे साठवली जाऊ शकते. दीर्घकाळ टिकणारी ही आलं - लसणाची पेस्ट नेमकी कशी बनवायची ते पाहूयात(Homemade Ginger Garlic Paste Recipe-How to Preserve Ginger Garlic Paste for 6 month and tips.)

 दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची पेस्ट बनवण्याची सोपी कृती... 

साहित्य :- 

१. लसूण - अर्धा किलो 
२. आलं - ३०० ग्रॅम 
३. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
४. मीठ - १ टेबलस्पून 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

कोथिंबीर-पुदिन्याची जुडी निवडली पण दोन दिवसात सडली तर ? ३ उपाय, पुदिना - कोथिंबीर राहील हिरवीगार...

कृती :- 

१. सर्वप्रथम लसूण पाकळ्या एकमेकांपासून वेगवेगळ्या करुन सुट्या करुन घ्याव्यात. 
२. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सर्व लसूण पाकळ्या बुडतील अशा घालाव्यात. 
३. त्यानंतर गॅसच्या मंद आचेवर ठेवून १० ते १५ मिनिटे हे पाणी उकळवून घ्यावे. 

कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी ८ टिप्स, नावडतं कारलंही होईल आवडत-ं भाजी अशी चमचमीत...

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

४. १० ते १५ मिनिटानंतर, या लसूण पाकळ्या गरम पाण्यातून काढून साध्या पाण्यांत ठेवाव्यात. या पाण्यांत आता ४ ते ५ बर्फाचे खडे घालावेत. 
५. या लसूण पाकळ्या साध्या पाण्यांत घातल्यावर हातांनी हलकेच चोळून त्याच्या साली अलगद काढून घ्याव्यात. 
६. त्यानंतर आलं स्वच्छ धुवून त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. 
७. मिक्सरच्या भांड्यात या सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या व आल्याचे लहान लहान तुकडे घालावेत. 
८. त्यात २ ते ३ टेबलस्पून तेल व १ टेबलस्पून मीठ घालून घ्यावे. 
९. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित पातळ होईपर्यंत मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. 

आलं - लसणाची पेस्ट स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती, पेस्ट टिकेल वर्षभर, जेवण होईल झटपट... 

आता ही तयार झालेली आलं - लसणाची पेस्ट एका काचेच्या हवाबंद बरणीत साठवून ठेवावी. ही आलं - लसणाची पेस्ट व्यवस्थित फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास पुढील किमान २ ते ३ महिने चांगली टिकून राहते.

Web Title: Homemade Ginger Garlic Paste Recipe-How to Preserve Ginger Garlic Paste for 6 month and tips.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.