सणावाराला पुरणपोळी, श्रीखंड पुरी, मसाले भात, कुरडई, आमरस आणि चटण्या व्यतिरिक्त अळूवडी (Gujrati Aluvadi) आवडीने खाल्ली जाते. अळूवडी खवय्यावर्ग फार मोठा आहे. अळूवडी व्यतिरिक्त काही लोक अळूचं फदफदं किंवा अळूची भाजी करतात (Cooking Tips). पण अधिक करून लोक अळूची वडी हमखास खातात. अळूची पानं फक्त चाविलाच नसून, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते. ज्यामुळे पचनासंबंधीचे विविध विकार, सांधेदुखी दुर करण्यासाठी प्रभावी ठरते. आतापर्यंत आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची अळूवडी खाऊन पाहिली असेल, पण कधी गुजराथी स्टाईल अळूवडी करून पाहिली आहे का? चवीला भन्नाट, बनवायला सोपी ही कुरकुरीत रेसिपी काही मिनिटात तयार होते(Homemade Gujarati Patra Recipe - How To Make Gujrati Patra at Home).
गुजराथी पद्धतीची क्रिस्पी अळूवडी करण्यासाठी लागणारं साहित्य
बेसन
तांदुळाचं पीठ
धणे
जिरे
फ्रिजमध्ये ठेवताच आलं सुकतं-खराब होतं? ५ सोप्या टिप्स; महिनाभर आलं राहील फ्रेश
बडीशेप
लवंग
दालचिनीचा तुकडा
हिरवी मिरचीची पेस्ट
आलं पेस्ट
हळद
लाल तिखट
हिंग
ओवा
मीठ
गरम मसाला
पांढरे तीळ
पापड खार
तेल
चिंचेचं पाणी
गुळ
पाणी
कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये अडीच कप बेसन आणि तांदुळाचं पीठ घ्या. आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक छोटा कप धणे, एक चमचा जिरे, एक चमचा बडीशेप, ६ लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घालून मसाले भाजून घ्या.
मसाले भाजून घेतल्यानंतर एका खलबत्त्यात काढून घ्या, व कुटून मसाला तयार करा. कुटून घेतलेला मसाला पीठ काढून घेतलेल्या बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात एक चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा आलं पेस्ट, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हिंग, एक चमचा ओवा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, २ चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा पापड खार आणि २ चमचे कोमट तेल घालून साहित्य चमच्याने मिक्स करा.
आता एका बाऊलमध्ये चिंचेचं पाणी घ्या. त्यात अर्धा कप किसलेला गुळ घालून मिक्स करा. तयार पाणी मिश्रणात ओतून हाताने मिक्स करा. साहित्य मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. १० मिनिटानंतर त्यात थोडं पाणी घालून मिक्स करा.
बॅटर रेडी झाल्यानंतर अळूची पानं घ्या. त्याची देठं काढून स्वच्छ धुवून पसरवा. पानांची उलटी बाजू चॉपिंग बॉर्डवर पसरवा. त्यावर थोडं बॅटर एकसारखे लावावे. त्यावर दुसरे पान लावून त्या पानालाही मिश्रण लावावे. मग ही पाने गोलाकार वळून घ्या, व धारदार सुरीने वड्या पाडाव्यात.
दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तळण्यासाठी तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात वड्या सोडून खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे गुजराथी पद्धतीची क्रिस्पी अळूवडी खाण्यासाठी रेडी.