Lokmat Sakhi >Food > विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

How To Make Gulkand At Home: गुलाबाच्या पाकळ्या आणि मोजके दोन- तीन पदार्थ वापरून घरच्याघरी गुलकंद तयार करणं अगदी सोपं आहे. ते कसं करायचं ते आता पाहूया (3 steps gulkand recipe)...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2023 09:07 AM2023-11-19T09:07:15+5:302023-11-19T09:10:02+5:30

How To Make Gulkand At Home: गुलाबाच्या पाकळ्या आणि मोजके दोन- तीन पदार्थ वापरून घरच्याघरी गुलकंद तयार करणं अगदी सोपं आहे. ते कसं करायचं ते आता पाहूया (3 steps gulkand recipe)...

Homemade gulkand, How to make gulkand at home? Gulkand recipe, 3 steps gulkand recipe | विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

Highlightsअगदी विकतच्यापेक्षाही खूप उत्कृष्ट चवीचं गुलकंद तुमच्या घरीच तयार झालेलं असेल....

गुलाबाच्या पाकळ्यांचा संपूर्ण अर्क ज्यामध्ये उतरलेला असतो, ते गुलकंद अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. दररोज नियमितपणे अगदी थोडंसं जरी गुलकंद खाल्लं तरी आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होतात. शरीरातली उष्णता किंवा दाह कमी होतो, तसेच त्वचेचे सौंदर्य वाढण्यासही मदत होते. म्हणूनच विकतचे महागडे आणि मुख्य म्हणजे वेगवेगळे प्रिझर्व्हेटिव्ह टाकून तयार केलेले गुलकंद खाण्यापेक्षा घरच्याघरी अगदी नैसर्गिकपणे गुलकंद (Homemade gulkand) कसे तयार करायचे ते पाहूया...(How To Make Gulkand At Home)

 

गुलकंद तयार करण्याची रेसिपी

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुलाबाची फुलं भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे गुलकंद तयार करण्यासाठी सध्याचे दिवस अगदी उत्तम आहेत. गुलकंद तयार करण्यासाठी गावरान गुलाबाचाच वापर करावा. घरच्याघरी गुलकंद कसं तयार करायचं, याविषयीचा हा व्हिडिओ pawar_omkar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

म्हातारपणीही एकदम फिट रहाल, फक्त 'या' ५ सवयी लावून घ्या

साहित्य

गुलाबाच्या पाकळ्या- ३०० ग्रॅम

साखर- १०० ग्रॅम

पिठी साखर- २०० ग्रॅम

ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

मध- ५० ग्रॅम

बडिशेप पावडर १० ग्रॅम

वेलची पावडर अर्धा टीस्पून

 

कृती

सगळ्यात आधी गुलाबाच्या पाकळ्या एका मोठ्या भांड्यात घ्या.

त्यानंतर साखर आणि बडिशेप एकत्र करून त्याची पावडर करून घ्या. ती पावडर गुलाब पाकळ्यांमध्ये टाका. तसेच पिठी साखरही टाका.

थंडीत त्वचा कोरडी पडते? त्वचेला मऊमुलायम बनविणारं ‘हे’ बॉडी लोशन वापरा, पाहा फरक

आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून कालवून घ्या. हाताचे चोळून चोळून एकजीव करून घ्या. हळूहळू गुलाबाला पाणी सुटेल.

यानंतर त्यात वेलची पावडर तसेच मध टाका आणि पुन्हा एकदा सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

आता हे मिश्रण एका एअर टाईट काचेच्या बरणीत भरा आणि ३ दिवसांसाठी उन्हामध्ये ठेवा.

३ दिवसांनी बरणी उघडून पाहा. अगदी विकतच्यापेक्षाही खूप उत्कृष्ट चवीचं गुलकंद तुमच्या घरीच तयार झालेलं असेल....

 

Web Title: Homemade gulkand, How to make gulkand at home? Gulkand recipe, 3 steps gulkand recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.