Lokmat Sakhi >Food > घरी केलेली गुळपोळी चिकट होते, सारण चुकतं? 'ही ' घ्या परफेक्ट रेसिपी आणि अचूक प्रमाण

घरी केलेली गुळपोळी चिकट होते, सारण चुकतं? 'ही ' घ्या परफेक्ट रेसिपी आणि अचूक प्रमाण

Homemade Gulpoli Perfect Recipe : घरीच तयार करा गुळपोळी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 15:01 IST2025-01-13T14:58:06+5:302025-01-13T15:01:45+5:30

Homemade Gulpoli Perfect Recipe : घरीच तयार करा गुळपोळी.

Homemade Gulpoli Perfect Recipe | घरी केलेली गुळपोळी चिकट होते, सारण चुकतं? 'ही ' घ्या परफेक्ट रेसिपी आणि अचूक प्रमाण

घरी केलेली गुळपोळी चिकट होते, सारण चुकतं? 'ही ' घ्या परफेक्ट रेसिपी आणि अचूक प्रमाण

गुळाची पोळी तर सर्वांनाच फार आवडते. मकरसंक्रातीला घरी छान गुळाच्या पोळीचा बेत असतो.(Homemade Gulpoli Perfect Recipe ) पण बरेचदा पोळ्या विकत आणायची वेळ येते. कारण घरी केलेल्या चिकट होतात. बाहेर कितीही चविष्ट गुळपोळी विकत मिळाली, तरी ती शेवटी विकतचीच. घरी केलेल्या गुळपोळीची मजा काही औरच आहे. या मकरसंक्रातीला घरीच तयार करा.(Homemade Gulpoli Perfect Recipe ) चिकट होईल असं वाटतंय? मुळीच चिंता नको. या पद्धतीने तयार करा. चिकट होणार नाही.

साहित्य:
तीळ, दाणे, खोबरं, गूळ, बेसन, कणिक, तूप, तेल

कृती:
१.एक वाटी तीळ अर्धी वाटी दाणे अर्धी वाटी खोबरं सगळं वेगवेगळं वाटून घ्या. एकत्र वाटण्याची चूक अनेक जण करतात त्यामुळे चिकटपणा जास्त येतो. खोबर्‍याला तेल सुटे पर्यंत वाटून घ्या. तीळ, दाणेसुद्धा एकदम बारीक करा.

२.आता सगळं एक एक करून भासायला सुरवात करा.  भाजताना मात्र तिन्ही गोष्टी एकत्र भाजा.

३. साधारण चार ते पाच चमचे तेल घेऊन, त्यात दोन चमचे बेसन परतून घ्या. बेसन छान परतून झाले की, तीळ दाणे खोबर्‍याचं मिश्रण त्यात घाला. आता सगळं एकजीव करून घ्या.(Homemade Gulpoli Perfect Recipe ) 

४.मिश्रणाच्या तिप्पट गूळ घ्या. किसून  मऊ करा. बरेचदा आपण गूळ किसण्यात आळस करतो. त्यामुळे पोळी लाटताना चिकटते आणि फाटते. गूळ व्यवस्थित किसून घ्या. आता तो हाताने मळून मऊ करा. अनेक जण चमचा वापरतात. पण हाताने जेवढा छान मऊ होतो तेवढा चमच्याने होत नाही.

५. सगळं एकत्र करून पुन्हा वाटून घ्या. 

६. कणिक दुधात तूप घालून भिजवून घ्या. नंतर तेल वापरून घट्ट मळून घ्या.

७.बरेचदा आपण पुरणपोळी प्रमाणे लाटीमध्ये सारण भरून लाटतो. तेव्हा पोळी फुटते . लाटीवर सारण ठेवा आणि वर आणखी एक लाटी ठेवा. सर्व बाजूनी बंद करा. आणि मग लाटून घ्या. 

८. परतताना छान तुपावर परता.

गरमागरम खा. गार झाली की चामट होते. छान गरमच खा. घरच्यांना नक्कीच आवडेल. आणि तुम्हालाही तयार केल्याचे समाधान मिळेल.

Web Title: Homemade Gulpoli Perfect Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.