साऊथ-इंडियन पदार्थांमध्ये इडली-डोसा आवडीने खाल्ली जाते. इडली-डोश्याचे पीठ दळताना साहित्यांचे प्रमाण चुकले तर, इडली-डोसे व्यवस्थित तयार होत नाही (South Indian Dishes). कित्येकवेळा पीठ फुलून आले नाही म्हणून इडली, डोसे मऊ, लुसलुशीत होत नाहीत. एवढा सगळा घाट इडली-डोसे मनासारखे झाले नाही तर, हिरमोड तर होतोच, शिवाय चवीलाही लागत नाही. ज्यामुळे पिठाची नासाडी होते (Cooking Tips).
उन्हाळ्यात इडली-डोश्याचे पीठ व्यवस्थित आंबावे; यासह त्याचे इडली-डोसे परफेक्ट तयार व्हावे असे वाटत असेल तर, त्यात काही गोष्टी मिसळा. साहित्यांचे प्रमाण चुकल्यावर इडली-डोसे व्यवस्थित तयार होत नाही (Idli-Dosa Batter). त्यामुळे इडली-डोश्याचं बॅटर तयार करताना साहित्यांचे अचूक प्रमाण कसे घ्यावे? पाहूयात(Homemade Idli Dosa Batter Guide).
इडली-डोश्याचं बॅटर तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
लागणारं साहित्य
तांदूळ
डाळ
महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही
हिरवी मिरची
या पद्धतीने तयार करा इडली-डोश्याचं परफेक्ट बॅटर
सर्वप्रथम, एका भांड्यात २ कप जाड तांदूळ निवडून घ्या. त्यात एक कप उडीद डाळ घाला. २ ग्लास पाणी घालून डाळ-तांदूळ धुवून घ्या. नंतर त्यात २ कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवा, व ४ ते ५ तासांसाठी साहित्य भिजत ठेवा. ५ तास झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेले डाळ-तांदूळ काढून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात जास्त प्रमाणात पाणी घालू नये.
कलिंगड लालबुंद-गोड रसरशीत आहे की नाही कसे ओळखाल? पाहा ३ टिप्स, निवडा परफेक्ट कलिंगड
तयार पेस्ट एका भांड्यात काढून ठेवा. नंतर त्यात २ ते ३ मिरच्या घालून मिक्स करा, व त्यावर झाकण लावून ठेवा. किंवा हवाबंद डब्यात पीठ ठेवा. १० ते १२ तासांसाठी आंबवण्यासाठी पीठ एका गरम ठिकाणी ठेवा. जेणेकरून पीठ फुलून येण्यास मदत होईल. शिवाय याचे इडली-डोसे व्यवस्थित तयार होतील. या पिठात मीठ घालून आपण मऊ इडली किंवा नरम, जाळीदार डोसे बनवू शकता. शिवाय याचे अप्पम, उत्तपा आणि अप्पे देखील सुरेख तयार होतील.