चपात्या आपल्या रोजच्या जेवणात चपाती असतेच. सर्वांच्या घरी रोज चपाती बनत असती तरी प्रत्येकाच्या घरच्या चपात्या वेगवेगळ्या असतात. कोणच्या पातळ, कोणाच्या जाड काहींच्या घरी मऊ, फुलके बनवले जातात. चपात्या परफेक्ट बनत नाहीत. (How To Make Easy Soft Chapati) तव्यात टाकल्यानंतर चपात्या फुगत नाही अशी अनेकींची तक्रार असते. चपाती व्यवस्थित फुलली नाही तर कच्चीसुद्धा लागू शकते. मऊ- लुसलुशित चपात्या बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतात. (Simple Ways to Make Chapati)
लोकांना वाटतं की चपाती करणं सोपं आहे पण ही एक कला आहे. परफेक्ट चपाती करणं खूप कमी लोकांना जमतं. काहीजण एकजण गोल, सॉफ्ट आणि फुललेल्या बनत नाहीत. चपात्या थोड्या वेळाने लगेच वातड होतात. तुम्ही बनवत असलेल्या चपात्याही परफेक्ट बनत नसतील तर तुम्ही सॉफ्ट चपात्या करण्यासाठी या सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. (How to Make Chapati Quick Chapati Recipe)
चपातीचे पीठ मिळण्याचे हॅक्स
परफेक्ट रोटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी पीठ व्यवस्थित मळणं गरजेचे असते. जर पीठ व्यवस्थित मळले गेले नाही तर चपाती व्यवस्थित फुलणार नाही. त्यासाठी पीठ मळण्याआधी पीठ परातीत गाळून घ्या. जेणेकरून पिठातील कोंडा निघून जाईल. पीठ कोमट पाण्याने मळून घ्या. असे केल्यानं चपात्या एकदम सॉफ्ट बनतील.
रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन
चपातीचे पीठ मळल्यानंतर एक पातळ कॉटनचा कापड पाण्यातून काढून पिळून घेऊन चपातीच्या पीठावर झाका. चपातीचे पीठ १० मिनिटांसाठी तसेच झाकून ठेवा. १ मिनिटं पीठ तळून तसंच ठेवल्यानंतर या पीठाच्या चपात्या लाटून घ्या जर तम्ही घाई घाईत कशाही चपात्या लाटल्या तर व्यवस्थित फुलत नाहीत.
परफेक्ट चपात्या कशा कराव्यात?
जेव्हा चपातीचे गोळा लाटून घ्याल तेव्हा लाटण्याआधी पुन्हा एकदा गोळा व्यवस्थित मळून घ्या.चपातीचा गोळा व्यवस्थित लवचीक असेल तर लाटायला सोपं पडतं.
चपात्या करण्याची योग्य पद्धत कोणती
साहित्य- गव्हाचे पीठ- २०० ग्राम, तेल- १०० ग्राम, मीठ चवीनुसार, दूध - अर्धा कप
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पीठात गरजेनुसार पाणी आणि २- ३ थेंब तेल घालून व्यवस्थित मळून घ्या. चपातीच्या पिठात गरजेनुसार दूध घालू शकता. यामुळे चपातीला मऊपणा येईल. दूध घालत असाल शक्यतो मीठ कमीच घाला. १० मिनिटांनी या पीठाचे गोळे बनवून साईडला ठेवून द्या. मग सर्व बाजूंनी समान चपाती लाटा. तवा गरम झाल्यानंतर त्यात चपात्या घाला आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्या. तयार आहे गरमागरम चपाती.