Lokmat Sakhi >Food > इडलीसाठी डाळ - तांदूळ भिजवायची, पीठ आंबवण्याची गरज नाही, इडली प्रिमिक्सने इडल्या होतील अगदी १० मिनिटांत...

इडलीसाठी डाळ - तांदूळ भिजवायची, पीठ आंबवण्याची गरज नाही, इडली प्रिमिक्सने इडल्या होतील अगदी १० मिनिटांत...

Idli Premix ! Soft Spongy Idlis ! No Eno! No Soda ! Just add water : इडलीचे पीठ तयार करण्यासाठी आता मोठा घाट घालावा लागणार नाही, मऊ, लुसलुशीत इडल्यांचे पीठ तयार करण्याची कृती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 09:00 AM2023-09-12T09:00:30+5:302023-09-12T09:05:01+5:30

Idli Premix ! Soft Spongy Idlis ! No Eno! No Soda ! Just add water : इडलीचे पीठ तयार करण्यासाठी आता मोठा घाट घालावा लागणार नाही, मऊ, लुसलुशीत इडल्यांचे पीठ तयार करण्याची कृती...

Homemade Instant Idli Premix Recipe - Soft & Moist Idli in 10 Minutes. Idli Mix - Just add Water. | इडलीसाठी डाळ - तांदूळ भिजवायची, पीठ आंबवण्याची गरज नाही, इडली प्रिमिक्सने इडल्या होतील अगदी १० मिनिटांत...

इडलीसाठी डाळ - तांदूळ भिजवायची, पीठ आंबवण्याची गरज नाही, इडली प्रिमिक्सने इडल्या होतील अगदी १० मिनिटांत...

आपल्यापैकी बऱ्याचशा घरात नाश्त्याला सकाळी डोसा, इडली, आप्पे, मेदू वडा असे साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ घरातील सगळेच खूप आवडीने खातात. जर आपल्याला नाश्त्याला सकाळी डोसा, इडली, आप्पे, मेदू वडा असे काही पदार्थ बनवायचे असतील तर आपण किमान १ दिवस आधी तांदूळ उडीद डाळ भिजत घालून त्याच पीठ काढून आंबवण्यासाठी ठेवून देतो. ही आंबवण्याची प्रक्रिया व्यवस्थित झाली तर इडली, डोसा, आप्पे खूप छान चविष्टय आणि मऊ होतात. 

इडली हा असा पदार्थ आहे की तो योग्य पद्धतीने फुलून आला तरच खायला मजा येते. फुगलेली, मऊ, टम्म इडली खाण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही. डोसा, इडली, आप्पे, मेदू वडा असे साऊथ इंडियन पदार्थ बनवताना त्याच पीठ तयार करण्यासाठी आपण गरजेनुसार उडीद डाळ, तांदूळ, इतर डाळी भिजवण्यास ठेवतो. परंतु जर एवढी मेहेनत करुन हे पीठ व्यवस्थित भिजले नाही किंवा फुलून आले नाही तर सगळंच गणित बिघडत. एकदा का हे इडलीचे पीठ फसले तर आपल्या मनासारख्या इडल्या तयार होत नाहीत. मग या न फुगलेल्या दडदडीत इडल्या खायला नकोशा वाटतात. अशावेळी घरच्या घरी एकदाच (Idli Mix - Just add Water) इडलीचे इन्स्टंट पीठ(Instant idli premix flour recipe) तयार करून ठेवले तर आयत्यावेळी देखील आपण झटपट इडल्या बनवू शकतो. इडलीचे असे इन्स्टंट पीठ (Instant Idli Premix) बनवून ठेवले तर ना पीठ भिजवायची झंझट ना पीठ फुलून येण्याचे टेन्शन. इडली तयार करण्यासाठीचे हे इन्स्टंट प्रिमिक्स कसे बनवायचे ते पाहूयात(How to make idli premix powder at home).  

साहित्य :- 

१. पांढरी उडीद डाळ - १ कप 
२. पातळ पोहे - १ कप 
३. तांदुळाचे पीठ - २ कप 
४. मीठ - १ टेबलस्पून 
५. बेकिंग सोडा - ३/४ टेबलस्पून 

इन्स्टंट बॅटर भिजवताना लागणारे साहित्य :- 

१. दही - १ कप 
२. पाणी - गरजेनुसार 

इडली करताना झाकणातल्या वाफेचं पाणी पडून ती ओली होते? १ सोपा उपाय... इडली बनेल परफेक्ट..

अस्सल गावरान मटकी भेळ खायची आहे ? घ्या झणझणीत रेसिपी, चव अशी की तोंडाला सुटेल पाणी...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या पॅनमध्ये पांढरी उडीद डाळ घालून त्याचा खमंग भाजलेला वास येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावी. 
२. उडीद डाळ भाजून झाल्यानंतर त्यात पातळ पोहे घालून ते देखील भाजून घ्यावेत.
३. आता हे दोन्ही जिन्नस भाजून घेतल्यांनंतर एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यावेत. 

नूडल्स करताना चिकट लगदा होतो ? शेफ पंकज भदोरिया सांगतात १ सोपी ट्रिक, नूडल्स होतील मस्त मोकळ्या...

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

४. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी. मिक्सरमधील ही बारीक पूड चाळणीने चाळून घ्यावी. 
५. आता या मिक्सरमधून वाटून घेतलेल्या बारीक पूडमध्ये तांदुळाचे पीठ घालावे. 
६. सर्वात शेवटी या तयार पिठात चवीनुसार मीठ व बेकिंग सोडा घालावा. 

पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...

एक थेंब ही तेल न वापरता फाफडा करता येतो ? पाहा, बिनतेलाची कुरकुरीत फाफडा रेसिपी...

आपले इडलीचे इन्स्टंट पीठ तयार आहे. हे पीठ आपण एका काचेच्या हवाबंद बरणीत भरून पुढील दोन महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता.

या इन्स्टंट पिठापासून इडली तयार करताना... 

या इन्स्टंट पिठापासून इडली तयार करताना, हे इन्स्टंट इडली पीठ २ कप, दही १ कप, पाणी १ कप घेऊन इडलीचे बॅटर तयार करून, नेहमीप्रमाणे इडल्या करतो तशीच कृती करून मऊ, लुसलुशीत इडल्या तयार करून घ्याव्यात. या गरमागरम इडल्या सांबार आणि चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.

Web Title: Homemade Instant Idli Premix Recipe - Soft & Moist Idli in 10 Minutes. Idli Mix - Just add Water.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.