Lokmat Sakhi >Food > केरळ स्टाइल परफेक्ट अप्पम करण्याची रेसिपी, नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी उत्तम

केरळ स्टाइल परफेक्ट अप्पम करण्याची रेसिपी, नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी उत्तम

Homemade Kerala Appam Batter : खोबऱ्याची चटणी, सांबार किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही अप्पम खाऊ शकता. (How to make Appam)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 05:30 PM2023-03-10T17:30:49+5:302023-03-10T17:56:36+5:30

Homemade Kerala Appam Batter : खोबऱ्याची चटणी, सांबार किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही अप्पम खाऊ शकता. (How to make Appam)

Homemade Kerala Appam Batter : Make Soft Jalidar Appam, Kerala Style Recipe | केरळ स्टाइल परफेक्ट अप्पम करण्याची रेसिपी, नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी उत्तम

केरळ स्टाइल परफेक्ट अप्पम करण्याची रेसिपी, नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी उत्तम

नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की विकेंडला काहीतरी नवीन खावंस वाटतं. घरच्याघरी इडली, डोसा बनण्याचा विचार केला तर कधी इडलीचं पीठचं व्यवस्थित फुलत नाही तर कधी डोसे तव्याला चिकटतात. (How to make appam at home) परफेक्ट डोसा बनवणं सर्वानाच जमतं असं नाही. (Homemade Kerala Appam Batter) जाळीदार, मऊ अप्पम बनवण्यासाठी तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स  लक्षात ठेवाव्या  लागतील.  खोबऱ्याची चटणी, सांबार किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही अप्पम खाऊ शकता. (How to make Appam)

अप्पम बनवण्याचं  साहित्य

एक ते दीड कप - तांदूळ

१ कप  - किसलेलं नारळ

२ चमचे - साखर

२ चमचे -मीठ

यीस्ट - अर्धा टिस्पून

१ कप - नारळपाणी किंवा साधं पाणी

कृती

१) अप्पम बनण्यासाठी तांदूळ धुवून ४-६ तास भिजत ठेवा नंतर पाणी काढून टाका आणि तांदूळ ब्लेंडरमध्ये घाला. पाणी आणि किसलेले नारळ घालून खडबडीत पेस्ट बनवा.

२) एक कप पेस्ट आणि पाणी मध्यम आचेवर गरम करा आणि घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहा. झाल्यावर बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या.

३) आता पिठात यीस्ट, साखर आणि मीठ, जाड तांदळाचे मिश्रण घाला, आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला आणि एकजीव होईपर्यंत बारीक करा. 

कांदा -लसूण न घालता करा हॉटेलस्टाइल 'भिंडी मसाला': सोपी रेसिपी- अजिबात चिकट होणार नाही भेंडी

४) एका मोठ्या भांड्यात पीठ घाला आणि झाकण बंद करा आणि 6-8 तास आंबू द्या.

५) आंबलेलं पीठ हलक्या हाताने मिक्स करा आणि गरम झालेल्या तेलाचा चमचा फिरवलेल्या अप्पम कढईत घाला. हळूवारपणे अप्पम वर काढा. तयार आहे कुरकुरीत, सॉफ्ट,  जाळीदार अप्पम

Web Title: Homemade Kerala Appam Batter : Make Soft Jalidar Appam, Kerala Style Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.