Join us  

जन्माष्टमी स्पेशल : 'माखन मिश्री' करा झटपट, कान्हाच्या नैवेद्यासाठी खास पारंपरिक पदार्थ, गोड असे की खावे पोटभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 4:03 PM

Homemade Makhan Mishri Recipe : Janmashtami Special Recipe Makhan Mishri : Makhan Mishri Recipe : बाळकृष्णाला आवडणारा खास गोड पदार्थ करा घरच्याघरी...

श्रीकृष्ण जन्माष्टमी अवघ्या देशभरात साजरी केली जाते. भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात कृष्णाचा जन्मोत्सव अगदी थाटामाटात साजरा केला जातो.  श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची पूजा करतात. देशभरातील मंदिरात मध्यरात्री पूजन विधी, भजन परंपरेप्रमाणे करण्यात येते. बाळकृष्णाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या वेगवेगळ्या पदार्थांच्या नैवेद्यामध्ये गोडाचे अनेक पदार्थ असतात. बाळकृष्णाला गोड पदार्थांची अतिशय आवड. लोणी आणि दूध तर सर्वाधिक प्रिय(Makhan Mishri Recipe).

बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून पंचपक्वान्नाऐवजी केवळ लोणी आणि मिश्रीचा नैवेद्य अर्पण केला जातो. माखन मिश्री म्हणजे लोणी-खडीसाखर, दूध, तूप, दही आणि मेवा यांचे एकत्रित मिश्रण तयार करून या गोड पदार्थाचा नैवेद्य श्रीकृष्णाला (Janmashtami Special Recipe Makhan Mishri) दाखवला जातो. बाळश्रीकृष्णाला आवडणारा खास माखन मिश्री हा गोड पदार्थ घरच्या घरी तयार करण्याची सोपी कृती पाहुयात(Homemade Makhan Mishri Recipe) 

साहित्य :- 

१. दुधावरची साठवलेली साय - १ बाऊल  (किंवा क्रिम)२. बर्फाचे खडे - ३ ते ४ खडे ३. खडीसाखरेची पावडर - २ टेबलस्पून   ४. केसर - १/२ टेबलस्पून ५. दूध - २ ते ३ टेबलस्पून ६. पिस्ता काप - २ टेबलस्पून 

कुरकुरीत तरी कांदा भजी मऊ पडतात? सोप्या ४ टिप्स, भजी राहतील कुरकुरीत...

गडबडीत दूध करपले? ६ सोपे उपाय, करपलेल्या दुधाचा वास काही मिनिटात जाईल उडून...

कृती :- 

१. सर्वात आधी दुधावरची साठवलेली साय किंवा बाहेर विकत मिळणारी क्रिम (या दोघांपैकी एक) एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन ब्लेंडरच्या मदतीने ते व्यवस्थित फेटून घ्यावे. जोपर्यंत या सायीपासून लोणी तयार होऊन ते वेगळे होत नाही तोपर्यंत ब्लेंडरच्या मदतीने ही साय फेटून घ्यावी. २. जेव्हा सायीपासून तयार झालेले लोणी बाऊलमध्ये दिसू लागेल तेव्हा त्यात ३ ते ४ बर्फाचे खडे घालून लोणी एकत्रित करुन त्याचा गोळा तयार करावा. ३. हा लोण्याचा तयार गोळा एका मोठ्या डिशमध्ये घेऊन त्यात थोडी खडीसाखरेची पावडर आणि दुधात भिजवलेले केसर घालावे. 

४. त्यानंतर हा लोण्याचा गोळा व दुधात भिजवलेले केसर व्यवस्थित मिक्स करून एकजीव करुन घ्यावे. जोपर्यंत केसरचा स्वाद लोण्यात उतरत नाही तोपर्यंत हे एकत्रित मिक्स करुन घ्यावे. ५. त्यानंतर आपण हे लोणी थोडा वेळ फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी देखील ठेवू शकतो. ६. त्यानंतर या तयार लोण्यावर थोडी खडीसाखर कुटून घालावी. त्यासोबतच आपण वरुन केसर आणि पिस्त्याचे काप देखील भुरभुरवू शकतो. 

माखन - मिश्री खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीजन्माष्टमी