Lokmat Sakhi >Food > गुलाबी थंडीत गरमागरम मसाला दूध तर हवंच! पाहा दूध मसाला करण्याची परफेक्ट रेसिपी...

गुलाबी थंडीत गरमागरम मसाला दूध तर हवंच! पाहा दूध मसाला करण्याची परफेक्ट रेसिपी...

Homemade Masala Doodh Powder : Masala Milk Recipe : How To Make Milk Masala Powder At Home For Winter Season : महागडे दूध मसाले आणणंच विसराल असा मसाला करा घरीच आणि झटपट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 07:08 PM2024-11-11T19:08:50+5:302024-11-11T19:22:35+5:30

Homemade Masala Doodh Powder : Masala Milk Recipe : How To Make Milk Masala Powder At Home For Winter Season : महागडे दूध मसाले आणणंच विसराल असा मसाला करा घरीच आणि झटपट...

Homemade Masala Doodh Powder Masala Milk Recipe How To Make Milk Masala Powder At Home For Winter Season | गुलाबी थंडीत गरमागरम मसाला दूध तर हवंच! पाहा दूध मसाला करण्याची परफेक्ट रेसिपी...

गुलाबी थंडीत गरमागरम मसाला दूध तर हवंच! पाहा दूध मसाला करण्याची परफेक्ट रेसिपी...

ऑक्टोबर हिट संपून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. आता हळूहळू थंडी पडून वातावरणात गारवा येऊ लागला आहे. कडाक्याची थंडी आणि वातावरणातील बदलांनुसार शरीराला अधिक ताकदीची गरज असते. या ऋतूत पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे आपल्याला सर्दी- खोकला, घसा खवखवणे यांसारख्या अनेक छोट्या - मोठ्या आजाराच्या तक्रारी सतावतात. यासाठीच हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली व मजबूत करणे आवश्यक असते. यासाठीच हिवाळ्यात भरपूर पौष्टिक आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाणे आवश्यक असते(Masala Milk Recipe).

हिवाळ्यात शरीराला गरजेची असणारी उष्णता आणि पोषक घटक हे दुधातून फार मोठ्या प्रमाणात मिळतात. यासाठीच, फार पूर्वीपासून हिवाळ्यात मसाले दूध पिणे अधिक फायदेशीर मानले जाते. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुणधर्म अधिक वाढतात. हिवाळ्यात असे पौष्टिक व चवदार मसाले दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. परंतु बऱ्याचजणांना मसाले दूध(Homemade Masala Doodh Powder)तयार करण्याची योग्य पद्धतच माहित नसते. तर काहीजण फक्त दुधात हळद, ड्रायफ्रुटस घालून पितात. परंतु ऐन हिवाळ्यात अशा कडाक्याच्या थंडीत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच  आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि शरीराला उष्णता मिळावी म्हणून मसाला दूध तयार करण्याची योग्य पद्धत पाहूयात(How To Make Milk Masala Powder At Home For Winter Season).    

साहित्य :- 

१. मखाणा - १/२ कप 
२. पिस्ता - १/२ कप 
३. बदाम - १/२ कप 
४. काजू - १/२ कप 
५. वेलची - ४ (सालीसहित वेलची)
६. दालचिनी - २ काड्या 
७. सूर्यफुलाच्या बिया - १ टेबलस्पून 
८. भोपळ्याच्या बिया - १ टेबलस्पून 
९. सुंठ पावडर - १ टेबलस्पून 
१०. हळद - १ टेबलस्पून 
११. केशर - ६ ते ८ काड्या

गरम मसाला घरीच करण्याची अचूक रेसिपी, मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात १ खास युक्ती...


बिर्याणीसाठी बासमती तांदूळ आणला पण शिजून गचकाच होतो? करा ४ गोष्टी-एकेक सुगंधी दाणा वेगळा...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एक पॅन घेऊन तो व्यवस्थित गरम करून घ्यावा. आता या पॅनमध्ये मखाणा, पिस्ता, बदाम, काजू, सालीसहित वेलची, दालचिनी असे सगळे मसाल्याचे पदार्थ घालून एकत्रित मंद आचेवर भाजून घ्यावेत. 
२. हे सगळे जिन्नस भाजत आल्यावर त्यात सूर्यफुल आणि भोपळ्याच्या बिया घालाव्यात. पुन्हा एकदा सगळे जिन्नस २ ते ३ मिनिटे भाजून घ्यावे. 
३. सगळ्यात शेवटी गॅसची फ्लेम बंद करुन त्यात सुंठ पावडर, हळद, केशराच्या काड्या घालून सगळे जिन्नस चमच्याने ढवळून एकत्रित करुन घ्यावे. 

शिळ्या चपातीची चमचमीत भेळ, फक्त १० मिनिटांत करा चायनीज भेळेसारखीच चटपटीत चपाती भेळ...

४. आता हे भाजून घेतलेले सगळे जिन्नस थोडे गार होऊ द्यावेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पूड होईपर्यंत सगळे पदार्थ वाटून घ्यावे. 
५. मसाला दूध तयार करण्यासाठी मसाला तयार आहे. हा मसाला एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवावा. 
६. एका भांड्यात दूध घेऊन त्यात १ कप दुधासाठी १ टेबलस्पून मसाला याप्रमाणे घालून दूध ३ ते ५ मिनिटे गरम करून घ्यावे. 

थंडीत गरमागरम पौष्टिक मसाला दूध पिण्यासाठी तयार आहे.

Web Title: Homemade Masala Doodh Powder Masala Milk Recipe How To Make Milk Masala Powder At Home For Winter Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.