वय वाढतं तसं हाडांमध्ये कमकुवतपणा येऊ लागतो. विशेषतः महिलांना ही समस्या अधिक जाणवते. तिशीत किंवा चाळीशीनंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होते. ज्यामुळे उठता-बसता हाडांमधून आवाज येणे, वारंवार गुडघे-कंबर दुखणे, यासह इतर हाडांच्या निगडीत समस्या निर्माण होतात. हाडांमधील कमतरता भरून काढण्यासाठी आपण आहारात पोषक घटकांचा वापर आणि प्रोटीन पावडरचा समावेश करू शकता.
मार्केटमध्ये प्रोटीन पावडर चढ्या दरात मिळते. ती अनेकांच्या खिश्याला परवडेलच असे नाही (Protien Powder). जर आपल्याला कमी किमतीत ते ही घरच्या घरी प्रोटीन पावडर तयार करायची असेल तर, ही रेसिपी फॉलो करा, व या पावडर सेवन रोज दुधातून करा (Health Tips). आपल्याला हाडांना नक्कीच मजबुती मिळेल(Homemade Protein Powder Recipe).
घरगुती प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
मखाणा
बदाम
काजू
रोज खा खजूर, आजार राहतील 'कोसों दूर', हिवाळ्यात खजूर खाण्याचे ४ फायदे; तब्येत राहील ठणठणीत
भाजलेले चणे
सूर्यफुलाच्या बिया
पांढरे तीळ
खसखस
अक्रोड
कृती
सर्वप्रथम, पॅनमध्ये एक कप मखाणा, एक कप बदाम, एक कप काजू, एक कप भाजलेले चणे, एक कप सूर्यफुलाच्या बिया, एक कप भाजलेले पांढरे तीळ, अर्धा कप खसखस आणि एक कप अक्रोडचे तुकडे घालून भाजून घ्या. साहित्य भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा.
साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, त्याची बारीक पावडर तयार करा. तयार पावडर एका हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवा, व एक कप दुधात चमचाभर प्रोटीन पावडर मिक्स करून प्या. या घरगुती पावडरमुळे हाडांना बळकटी मिळेल. शिवाय आरोग्यही सुदृढ राहील.
बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल
दुधातून प्रोटीन पावडर पिण्याचे फायदे
स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने आवश्यक असतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ही पावडर दुधात मिक्स करून प्यायल्याने शरीरातील कॅल्शियममध्ये वाढ होते आणि शरीर तंदुरूस्त होते. मुख्य म्हणजे हाडंही बळकट होतात. प्रोटीन पावडरमधील साहित्यातील पौष्टीक घटक आरोग्याला अनेक गोष्टी प्रदान करतात. याशिवाय शरीराला चांगली उर्जाही प्राप्त होते.