Join us  

विकतचा टोमॅटो सॉस जास्त प्रमाणात खाणं धोक्याचंच, म्हणून घरीच करा हेल्दी सॉस, बघा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 5:07 PM

Healthy Tomato Sauce Recipe: घरच्याघरीच उत्तम चवीचा आणि अतिशय पौष्टिक असा टोमॅटो सॉस करता येतो. ही बघा त्याचीच एक सोपी रेसिपी.

ठळक मुद्देविकतच्या सॉसमध्ये मीठ, साखर, फ्रुक्टोज आणि इतर प्रिझर्व्हेटिव्ह्ज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचं अतिसेवन आरोग्यासाठी निश्चितच हानिकारक आहे.

आजकाल मुलांना पोळी, ब्रेड, पराठा, इडली, पुऱ्या अशा सगळ्याच पदार्थांसोबत खायला टोमॅटो साॅस पाहिजे असतो. विकत मिळणारा टोमॅटो सॉस असा प्रत्येक वेळी खाणं तब्येतीसाठी खरोखरच हानिकारक आहे. कारण त्या सॉसमध्ये मीठ, साखर, फ्रुक्टोज आणि इतर प्रिझर्व्हेटिव्ह्ज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचं अतिसेवन आरोग्यासाठी निश्चितच हानिकारक आहे. म्हणूनच असा विकतचा सॉस मुलांना रोजच्या रोज देण्यापेक्षा घरीच टोमॅटो सॉस तयार करा (How to make tomato sauce at home?). पद्धत अगदी सोपी असून अवघ्या काही मिनिटांतच टोमॅटो सॉस तयार होतो (Healthy tomato sauce recipe). ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या kidzapzoe या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

टोमॅटो सॉस करण्याची रेसिपी साहित्य

मध्यम आकाराचे ८ टोमॅटो

मध्यम आकाराचे ४ कांदे

सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात- नाक बंद होतं? तज्ज्ञ सांगतात एक सोपा उपाय, करून बघा

लसणाच्या १० पाकळ्या

आल्याचा लहानसा तुकडा

चवीनुसार मीठ आणि गूळ

 

कृती१. टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे काप करून घ्या. तसेच कांद्याचेही काप करून घ्या.

२. कुकरमध्ये टोमॅटो, कांदे, लसूण, आलं टाका. हे सगळं साहित्य बुडेल एवढं पाणी घाला.

आंबेहळदीची पौष्टिक चटणी, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांची खास रेसिपी- चविष्ट आणि हेल्दी 

३. कुकरचं झाकण लावून टाका आणि मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या होऊ द्या.

४. कुकर थंड झालं की सगळं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्याची प्युरी करा.

 

५. ही प्युरी आता गाळण्यातून व्यवस्थित गाळून घ्या.

६. गाळून घेतलेल्या प्युरीचा आपल्याला सॉस करायचा आहे. गाळलेली प्युरी एका कढईमध्ये टाकून गॅसवर उकळत ठेवा. त्यात चवीनुसार मीठ आणि गूळ टाका.

मिस युनिव्हर्स म्हणून शेवटचा रॅम्पवॉक करताना गहिवरली हरनाज संधू, चालताना अडखळली आणि... व्हिडिओ व्हायरल 

मिश्रणाला चांगली उकळी आली, थोडा घट्टपणा आला की सॉस झाला तयार. गाळणीत उरलेला चोथा फेकून देऊ नका. वरण, भाजी किंवा थालिपीठ करण्यासाठी तुम्ही तो वापरू शकता.

७. काचेच्या बरणीत घालून फ्रिजमध्ये ठेवल्यास हा सॉस १५ दिवस चांगला राहू शकतो.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.लहान मुलं