Join us  

टोस्टर वापरूनही करता येईल तंदुरी रोटी, बघा भन्नाट ट्रिक - घरीच करा हॉटेलसारखी तंदुरी रोटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 12:29 PM

How to make Tandoori Roti in Toaster : TOASTER ROTI :आता टोस्टरचा वापर करुन आपण झटपट घरच्या घरीच हॉटेल सारखी तंदुरी रोटी बनवू शकता, त्याची सोपी रेसिपी पाहूयात...

आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बरेचदा भाजी सोबत रोटी ऑर्डर करतो. या रोटीचे अनेक प्रकार हॉटेलमध्ये उपलब्ध असतात. तंदुरी रोटी, बटर रोटी, मसाला रोटी असे वेगवेगळे रोटीचे प्रकार आपण खातो. आपल्या नेहमीच्या चपात्यांपेक्षा रोटी थोडी जाड व मोठी असते. अशी रोटी मसालेदार ग्रेव्ही असणाऱ्या भाजीसोबत खायला खूपच छान लागते(homemade whole wheat tandoori roti without tandoor).

हॉटेलसारखी तंदुरी रोटी आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु अनेक प्रयत्न करूनही हॉटेलसारखी तंदुरी रोटी घरी बनत नाही. परंतु आपण एक साधीसोपी ट्रिक वापरुन हॉटेलसारखी तंदुरी रोटी (How to make Tandoori roti in toaster) घरीच बनवू शकतो. ब्रेडला टोस्ट करण्यासाठी अनेकजण टोस्टरचा वापर करतात. याच  टोस्टरच्या मदतीने आपण तंदुरी रोटी सुद्धा बनवू शकतो. तेव्हा घरच्या घरी तंदुरी रोटी बनवण्यासाठी टोस्टरचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात(How to make Tandoori roti in toaster).

 तंदुरी रोटीसाठी पीठ मळून घ्यावे ... 

सर्वात अधिक एक मोठं भांड घेऊन त्यात तीन कप गव्हाचे पीठ घ्या. त्यानंतर यात प्रत्येकी एक चमचा बेकिंग सोडा व मीठ घालावे. आता पीठ व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यावे जेणेकरून मीठ व बेकिंग सोडा त्यात एकजीव होऊ शकेल. मिक्स केल्यावर यात एक कप दही मिसळा. मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्या. आता या पिठावर ओला कपडा गुंडाळून ते तासभर तसेच ठेवून द्यावे. अशाप्रकारे तंदुरी रोटीचे पीठ तयार होते.

फणस कापण्याचा व्याप मोठा, हात-सुरी चिकट होते? ३ सोप्या टिप्स- फणस खा- कापा-बरंका..

कशी तयार कराल तंदुरी रोटी ?

तंदुरी रोटी बनवण्यासाठी आता तंदूरची गरज नाही. रोटी बनवण्यासाठी तवा गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करून घ्या. एका बाजूला रोटी लाटून घ्या आणि  तव्यावर टाकून हलकं शेकवून घ्या. अशाप्रकारे सर्व तंदुरी रोटी शेकवून घ्या.

मुरमुऱ्याचा वडा कधी खाल्ला आहे? १ वाटी मुरमुऱ्याचे करा झटपट वडे, शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पदार्थ..

टोस्टरमध्ये बनवा तंदुरी रोटी :- 

टोस्टर वर करून यात दोन रोटी एकत्र टाका. रोटीचा आकार जास्त मोठा नसावा कारण यामुळे रोटी टोस्टरमध्ये अडकू शकते. अशाप्रकारे रोट्या दोन्ही बाजुंनी चांगल्या भाजल्या जातील आणि फुलतील. रोटी टोस्टरमधून बाहेर काढल्यावर त्यावर आपण तूप किंवा बटर लावू शकता. तंदुरी रोटी खाण्यासाठी तयार आहे, आपण कोणत्याही प्रकारच्या भाजीसोबत ही तंदुरी रोटी खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सपाककृती