Lokmat Sakhi >Food > गरमागरम पराठा मक्खन मारके; थंडीत मस्त खा हेल्दी पराठे! त्यासाठी 6 टिप्स, खाओ-खिलाओ

गरमागरम पराठा मक्खन मारके; थंडीत मस्त खा हेल्दी पराठे! त्यासाठी 6 टिप्स, खाओ-खिलाओ

पराठा म्हणजे झटपट होण्यासारखी आणि तरीही हेल्दी रेसिपी...यामध्ये कोणत्याही भाज्या, पनीर काहीही घातले तरी लहान मुले सॉस, दही, लोणच्यासोबत अगदी आनंदाने खातात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 03:39 PM2021-11-03T15:39:10+5:302021-11-03T15:56:36+5:30

पराठा म्हणजे झटपट होण्यासारखी आणि तरीही हेल्दी रेसिपी...यामध्ये कोणत्याही भाज्या, पनीर काहीही घातले तरी लहान मुले सॉस, दही, लोणच्यासोबत अगदी आनंदाने खातात...

Hot paratha butter marke; Eat healthy parathas in the cold! 6 tips for that, eat-feed | गरमागरम पराठा मक्खन मारके; थंडीत मस्त खा हेल्दी पराठे! त्यासाठी 6 टिप्स, खाओ-खिलाओ

गरमागरम पराठा मक्खन मारके; थंडीत मस्त खा हेल्दी पराठे! त्यासाठी 6 टिप्स, खाओ-खिलाओ

Highlightsपराठा खा, पण तो आणखी हेल्दी होण्यासाठी काही छोट्या टिप्सचा वापर कराहेल्दी खाओ, मस्त रहो - उत्तम आरोग्यासाठी पौष्टीक आहारही तितकाच गरजेचा असतो.

थंडीच्या दिवसांत गरमागरम पराठा म्हणजे मेजवानीच. या पराठ्यावर भरपूर बटर किंवा तूप घेतलं की आणखी काय हवं? बटाटा, पनीर, मेथी, पालक कॉर्न अगदी कोबी, गाजर आणि दुधी घातलेला पराठा सगळे आवडीनी खातात. कधी लहान मुलं भाज्या खात नाहीत म्हणून किंवा सारखी पोळीभाजी खायचा कंटाळा आला म्हणून पराठा हा नेहमीच मस्त पर्याय  असतो. भारतीय जेवणातील एक प्रसिद्ध डिश म्हणून पराठ्याची ओळख आहे. अचानक कोणी पाहुणे येणार असतील तरी आपण पटकन पराठा करु शकतो. त्यामुळे ऐनवेळी काय करायचे ही अडचण दूर व्हायला मदत होते.  पंजाब आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये पराठा हा जेवणातील मुख्य पदार्थ असतो. पराठा म्हणजे कार्बोहायड्रेटस आणि फॅटस असे वाटून अनेक जण पराठा खाणे टाळतात. पण असे वाटणाऱ्यांसाठी आम्ही घेऊन आलोय काही सोप्या टिप्स. ज्यामुळे तुमचा पराठा टेस्टी तर होतोच पण हेल्दीही होऊ शकतो. यासाठी तुम्ही निवडलेले धान्य, त्यातील स्टफींग आणि तेल हे तिन्हीही हेल्दी असायला हवे. पाहूयात पराठा हेल्दी होण्याच्या काही खास टिप्स...

( Image : Google)
( Image : Google)

१. आवरण - पराठ्याचे आवरण कोणत्या धान्याचे आहे यावर तो पराठआ किती हेल्दी आहे हे ठरते. मैद्याऐवजी मल्टीग्रेन किंवा होलव्हीटचे करावे. या आवरणासाठी तुम्ही गव्हाचे पीठही वापरु शकता. तसेच यातील प्रोटीन व्हॅल्यू वाढवायची असेल तर तुम्ही या पिठात मळताना दही घालू शकता. तसेच पराठ्यातील कॅल्शियम कंटेंट वाढवायचा असेल तर तुम्ही हे पीठ दुधात मळू शकता. यामुळे पराठा मऊ व्हायलाही चांगली मदत होईल. 

२. स्टफींग - आपल्या सगळ्यांना आलू पराठा आणि पनीर पराठा आवडतो. पण याशिवायही अनेक घटक असतात ज्यामुळे आपण पराठा आणखी हेल्दी बनवू शकतो. यासाठी सोया, ब्रोकोली, मिक्स व्हेड, टोफू, वेगवेगळ्या डाळी, कडधान्ये यांचे पराठा तुम्ही करु शकता. ब्रेकफास्टसाठी हा उत्तम पर्याय होऊ शकतो. तसेच आवरण जास्त घेण्याऐवजी आतील स्टफींग जास्त घेतल्यास पराठा जास्त हेल्दी होण्यास मदत होते. 

३. योग्य तेलाचा वापर - पराठ्याला जास्ती तेल लागते म्हणून तो बदनाम झालेला आहे. पण तुम्ही योग्य असे नैसर्गिक आणि हेल्दी फॅटस असलेले तेल पराठ्यासाठी वापरले तर तुम्ही हा पदार्थ लो कॅलरी पदार्थांत धरु शकता. दोन्ही बाजुने पराठा व्यवस्थित भाजून घ्या त्यानंतर त्यावर तेल किंवा तूप लावा. त्यामुळे पराठा क्रीस्पी चर होईलच पण त्यातील कॅलरीजही कमी होतील. 

( Image : Google)
( Image : Google)

४. पालेभाज्यांचा वापर करा - पालक, मेथी, कोथिंबिर यांसारख्या पालेभाज्यांची प्युरी करुन ती पराठाच्या आवरणात घालू शकता. त्यामुळे पराठा जास्त हेल्दी व्हायला मदत होईल. यामध्ये तुम्ही राजमा, सोया किंवा चना प्युरीही वापरु शकता. 

५. मसाल्याचे पदार्थ वापरा - पराठ्याला चव येण्यासाठी तुम्ही त्याच्या स्टफींगमध्ये ओवा, मिक्स्ड हर्ब, तीळ , धने-जीरे पावडर, ओरिगॅनो, कोथिंबिर, पुदीना या पदार्थांचा वापर करु शकता. यामुळे चव तर येईलच पण पराठा क्रीस्पी होण्यासही मदत होईल. 

६. एकावेळी किती खायचे - एका पराठ्यामध्ये २५० ते ३०० कॅलरीज असतात. शरीरातील सर्व घटकांची पातळी योग्य ठेवणे आवश्यक असल्याने एकावेळी एकच पराठा खाल्लेला चांगला. तसेच हा पराठा तुम्ही दही किंवा ताकासोबत खाऊ शकता, त्यामुळे त्याची पौष्टीकता आणखी वाढते. 
 

Web Title: Hot paratha butter marke; Eat healthy parathas in the cold! 6 tips for that, eat-feed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.