डाळ भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. पण डाळभात खाऊन कंटाळा आला की काहीतरी वेगळं खावसं वाटतं. डाळीची खरी चव बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. (Restaurant Style Dal Tadka Recipe try this) जेवणात दाल तडका बनवला तर साध्या जेवणाचीही चव वाढते आणि सगळेचजण पोटभर जेवतात. हॉटेलस्टाइल दाल तडकाची सोपी रेसेपी पाहूया. (Hotel Style Dal Tadka Recipe)
रोजच्या जेवणात डाळ खाण्याचे फायदे
१) डाळींच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्यासोबतच जुलाब आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. डाळ डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. याचे नियमित सेवन केल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते.
२) चणा डाळीचे नियमित सेवन केल्यास हार्मोन्सची पातळी वाढण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ते कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. या डाळीत चरबीचे प्रमाण कमी असल्याने शरीरातील चरबीचे प्रमाणही याच्या सेवनाने कमी करता येते.
३) उडीद डाळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि आपले संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोह अत्यंत आवश्यक असते. यामुळे अॅनिमिया होत नाही आणि शरीरातील एनर्जी लेव्हल वाढण्यासही मदत होते. उडीद डाळ मजबूत हाडांसाठी देखील आवश्यक आहे. याशिवाय ही डाळ मधुमेहावरही फायदेशीर आहे.
४) ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी मूग डाळ खूप महत्वाची आहे. गॅसची समस्या दूर करण्यासाठी हे फायदेशीर आहे. या डाळीच्या सेवनाने सौंदर्य वाढण्यासही मदत होते. याशिवाय मूग डाळीचे सेवन मधुमेह आणि हृदयविकारांवरही फायदेशीर आहे
५) तुरीच्या डाळीत प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. याचे नियमित सेवन केल्यास गॅस आणि पोटदुखीच्या समस्येपासून सुटका मिळते. फायबरचाही चांगला स्रोत असल्याने वजन कमी करण्यातही त्याचा फायदा होतो.