नगेट्स हा एक वेस्टर्न खाद्य पदार्थ आहे. सहसा घरच्या छोटेखानी पार्टीज, फंक्शन, समारंभ अशावेळी स्नॅक्स म्हणून नगेट्स आवडीने खाल्ले जातात. नगेट्स हे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. गरमागरम, कुरकुरीत नगेट्स (Vegetable Nuggets Recipe) सॉससोबत खायला चांगले लागतात. मोठमोठ्या रेस्टोरंट किंवा कॅफेजमध्ये जाऊन आपण बरेचदा नगेट्स ऑर्डर करतो. अनेकदा आपल्याला घरच्या पार्टीजसाठी किंवा मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय द्यावं असा प्रश्न पडला असेल तर आपण झटपट तयार होणारे नगेट्स करू शकता.
काहीवेळा घरातील लहान मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाण्याला नकार देतात. परंतु तेच नगेट्स किंवा इतर जंक फूडचे पदार्थ आवडीने खातात. अशावेळी लहान मुलांच्या पोटात पौष्टिक भाज्या जाव्यात म्हणून आपण त्यांना हे व्हेजिटेबल नगेट्स (Vegetable Nuggets Recipe) करून देऊ शकता. व्हेजिटेबल नगेट्स बनवता त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक भाज्य आपण घालू शकता. यानिमित्ताने काहीतरी नवीन खाण्याचा आनंद मुलांना होतो तसेच काहीतरी पौष्टिक गोष्टी दिल्याने आपणही समाधानी होतो. बटाट्याच्या मिश्रणापासून तयार होणारे हे नगेट्स बनवायला सोपे आणि खायला तितकेच पौष्टिक आहेत. घरच्या घरी कॅफे स्टाईल व्हेजिटेबल नगेट्स बनवण्यासाठीची सोपी कृती लक्षात ठेवूयात(Hotel Style Hot Crispy-Crunchy Nuggets Easy Recipe to Make at Home).
साहित्य :-
१. उकडून लगदा करुन घेतलेले बटाटे - ३
२. पनीर - १/२ कप (किसून घेतलेले)
३. गाजर - १/२ कप (किसून घेतलेले)
४. शिमला मिरची - १/२ कप (बारीक चिरुन घेतलेली)
५. कोबी - १/२ कप (बारीक चिरून घेतलेला)
६. मटार - १/४ कप (उकळवून घेतलेले)
७. लसूण - ३ ते ६ पाकळ्या (किसून घेतलेली)
८. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
९. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून
१०. ओरेगॅनो - १ टेबलस्पून
११. चाट मसाला - १ टेबलस्पून
१२. मीठ - चवीनुसार
१३. ब्रेड स्क्रम्स - ३ ते ४ टेबलस्पून
१४. मैदा - २ टेबलस्पून
१५. कॉर्न फ्लॉवर - २ टेबलस्पून
१६. पाणी - १ ते २ कप
१७. मक्याचे दाणे - १ कप (उकळवून घेतलेले)
१८. तेल - १ ते २ टेबलस्पून
स्वत:लाच द्या स्पेशल दावत, घरच्याघरी ‘दाल मखनी’ करण्याची सोपी रेसिपी- नेहमीच्या डाळीपेक्षा खास...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये उकडून मॅश केलेले बटाटे घ्यावेत.
२. या उकडून घेतलेल्या बटाट्याच्या मिश्रणात किसलेले पनीर, किसलेले गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी, उकळवून घेतलेले मटार व मक्याचे दाणे घालावेत.
३. त्यानंतर या मिश्रणात किसलेल आलं, काळीमिरी पूड, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, चाट मसाला, मीठ, ब्रेड स्क्रम्स घालून हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....
रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...
४. आता या मिश्रणाच्या छोट्या छोट्या नगेट्स टिक्कीज बनवून घ्याव्यात.
५. आता या नगेट्ससाठी स्लरी बनवून घेताना एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ व पाणी घालून पातळसर स्लरी बनवून घ्यावी.
६. या तयार केलेल्या स्लरीमध्ये तयार केलेले नगेट्स घोळवून घ्यावेत त्यानंतर हे नगेट्स पुन्हा एकदा ब्रेड स्क्रम्समध्ये घोळवून घ्यावेत.
७. आता एका कढईमध्ये तेल घेऊन हे नगेट्स दोन्ही बाजुंनी खरपूस तळून घ्यावेत.
नगेट्स खाण्यासाठी तयार आहेत. हे गरमागरम नगेट्स सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.