Lokmat Sakhi >Food > भाजीसाठी वाटण-ग्रेव्ही बनवायला वेळच मिळत नाही? घरगुती मसाल्याची बनवा हॉटेलस्टाईल ग्रेव्ही..

भाजीसाठी वाटण-ग्रेव्ही बनवायला वेळच मिळत नाही? घरगुती मसाल्याची बनवा हॉटेलस्टाईल ग्रेव्ही..

hotel style indian curry gravy : रोजच्या स्वयंपाकात वापरता येईल अशी ग्रेव्ही घरीच बनवून ठेवा; टिकेल भरपूर दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2024 01:49 PM2024-02-16T13:49:11+5:302024-02-16T13:50:15+5:30

hotel style indian curry gravy : रोजच्या स्वयंपाकात वापरता येईल अशी ग्रेव्ही घरीच बनवून ठेवा; टिकेल भरपूर दिवस

hotel style indian curry gravy | भाजीसाठी वाटण-ग्रेव्ही बनवायला वेळच मिळत नाही? घरगुती मसाल्याची बनवा हॉटेलस्टाईल ग्रेव्ही..

भाजीसाठी वाटण-ग्रेव्ही बनवायला वेळच मिळत नाही? घरगुती मसाल्याची बनवा हॉटेलस्टाईल ग्रेव्ही..

बऱ्याचदा रोजच्या जेवणाला काय बनवावं सुचत नाही. रोजची त्याच प्रकारची फोडणीची भाजी खाऊन कंटाळा येतो. अनेक जण फक्त कांद्याची फोडणी देऊन भाजी तयार करतात. तर काही जण काही मसाले घालून भाजी वाफेवर शिजवतात. स्पेशल भाजी तयार करायची असेल तर, आपण वाटण तयार करतो. धावपळीच्या जीवनात वाटण करायला वेळ मिळत नाही. शिवाय वाटण तयार करून ठेवलं तर, अधिक वेळ टिकत नाही (Cooking Tips).

ग्रेव्ही लवकर खराब होते. वाटण तयार करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात (Cooking Tips). पण पदार्थात वाटण घालताच त्याची चव दुपट्टीने वाढते. जर आपल्याला प्रत्येक भाजीत वापरता येईल असे वाटण, ग्रेव्ही तयार करायची असेल तर, या हॉटेलस्टाईल पद्धतीने करून पाहा. भाजीमध्ये ग्रेव्ही घालताच, पदार्थाची चव नक्कीच वाढेल(hotel style indian curry gravy).

हॉटेलस्टाईल ग्रेव्ही करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

कांदे

धणे

कपभर पोहे-५ कप पाणी, दुप्पट फुलणारे पापड करा घरीच, वाळवण्यासाठी गच्चीवरही जाण्याची गरज नाही..

काजू

टोमॅटो

मीठ

कोथिंबीर

हिरवी मिरची

तमालपत्र

दालचिनी

लवंग

वेलची

काळी मिरी

हळद

आलं-लसूण पेस्ट

लाल तिखट

धणे पावडर

जिरे पावडर

कृती

सर्वप्रथम, एका कढईत ४ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात २ उभे चिरलेले कांदे घालून फ्राय करून घ्या. कांद्याचा रंग लाल झाल्यानंतर त्यात अर्धा कप धणे घालून भाजून घ्या. कांद्याचा रंग सोनेरी झाल्यानंतर त्यात एक कप काजू, एक टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर त्यात कोथिंबीर, २ हिरवी मिरची घालून मिक्स करा, गॅस बंद करा. मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं साहित्य काढून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.

दाबेलीत भरायचे सारण जमत नाही? घ्या कच्छी दाबेली करण्याची रेसिपी - सारण जमेल परफेक्ट

एका कढईत ४ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात २ तमालपत्र, दालचिनीचा एक छोटा तुकडा, ४ ते ५ लवंग, २ ते ३ वेलची आणि काळी मिरी घालून भाजून घ्या. एका बाऊलमध्ये एक टेबलस्पून हळद, २ चमचा आलं-लसूण पेस्ट, चार चमचे लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, एक चमचा जिरे पावडर आणि एक कप पाणी घालून मिक्स करा. तयार मसाला कढईत ओतून मिक्स करा. नंतर त्यात वाटलेला मसाला घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

१० मिनिटानंतर गॅस बंद करा, व तयार मसाला एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. आपण या ग्रेव्हीचा वापर कोणत्याही भाजीमध्ये करू शकता. शिवाय ही ग्रेव्ही योग्यरित्या स्टोर करून ठेवल्यास ७ ते १० दिवस आरामात टिकेल. 

Web Title: hotel style indian curry gravy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.