विकेंड आला की आपल्याला पोळी-भाजी सोडून वेगळं काहीतरी हवं असतं. साऊथ इंडियन पदार्थ पौष्टीक, पोटभरीचे आणि सगळ्यांना आवडीचे असल्याने विकेंडला हमखास त्याचा बेत केला जातो. पण नेहमी इडली, डोसा असं खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण हॉटेलस्टाईल परफेक्ट स्पंज डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत. हा डोसा अतिशय सॉफ्ट असल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच खाऊ शकतात. तसेच हा डोसा करायला अजिबात वेळ लागत नसल्याने झटपट होणारी ही खास डीश अगदी कमी वेळात, कष्टात आपल्यासमोर हजर होऊ शकणार आहे (Hotel Style Instant Sponge Dosa Recipe).
डोसा किंवा साऊथ इंडीयन काही करायचे म्हटले की डाळ-तांदूळ भिजत घालण्यापासून ते आंबवून पीठ बनवण्यापर्यंतची बरीच प्रक्रिया असते. त्यामुळे साधारपणे २ दिवस आधीपासून आपल्याला याची तयारी करावी लागू शकते. पण आता आपण जी रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये अगदी डोसा खायचे मनात आल्यावर आपण झटपट स्पंज डोसा तयार करु शकणार आहोत. विशेष म्हणजे इतका इंस्टंट असूनही हा डोसा एकदम हॉटेलसारखा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार होत असल्याने तो घरातील सगळेच आवडीने खातील. प्रसिद्ध शेफ संज्योत खीर यांनी ही रेसिपी आपल्या युट्यूब चॅनेलवरुन शेअर केली असून हा डोसा नेमका कसा करायचा ते पाहूया...
साहित्य -
१. दही - १ वाटी
२. रवा - १ वाटी
३. पातळ पोहे - १ ते २ चमचे
४. साखर – १ चमचा
५. मीठ – चवीनुसार
कृती -
१. मिक्सरच्या भांड्यात दही, रवा आणि पोहे धुवून घालायचे.
२. यामध्ये मीठ, साखर घालून त्यात अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण मिक्सरवर फिरवून घ्यायचे.
३. आवश्यकता वाटल्यास यामध्ये थोडे थोडे पाणी घालून डावातून पडेल असे पीठ तयार करायचे.
४. हे पीठ १० ते १५ मिनीटे झाकून ठेवावे किंवा लगेचच वापरले तरी चालते.
५. हे पीठ तयार करताना प्रमाण योग्यप्रकारे घेतले तर पीठ परफेक्ट होण्यास मदत होते.
६. पोह्यामुळे पीठाला हलकेपणा येऊन डोसा सॉफ्ट होण्यास मदत होते.