Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखी ग्रेव्ही घरी करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी, ग्रेव्हीचा रंग - चव एकदम परफेक्ट...

हॉटेलसारखी ग्रेव्ही घरी करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी, ग्रेव्हीचा रंग - चव एकदम परफेक्ट...

Hotel style all-purpose curry base gravy : Hotel Style Multipurpose Gravy : हॉटेलसारखी परफेक्ट ग्रेव्ही आता बनवा घरच्या घरी, स्वयंपाक होईल स्वादिष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 07:28 PM2024-06-26T19:28:25+5:302024-06-26T19:42:38+5:30

Hotel style all-purpose curry base gravy : Hotel Style Multipurpose Gravy : हॉटेलसारखी परफेक्ट ग्रेव्ही आता बनवा घरच्या घरी, स्वयंपाक होईल स्वादिष्ट...

Hotel Style Multipurpose Gravy Hotel style Multi purpose style gravy How to Make Homemade Gravy | हॉटेलसारखी ग्रेव्ही घरी करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी, ग्रेव्हीचा रंग - चव एकदम परफेक्ट...

हॉटेलसारखी ग्रेव्ही घरी करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी, ग्रेव्हीचा रंग - चव एकदम परफेक्ट...

आपण हॉटेलमध्ये गेल्यावर शक्यतो रोटी आणि वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर करतो. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या या भाज्या बहुतेकवेळा चटपटीत ग्रेव्हीच्या असतात. हॉटेलमधल्या ग्रेव्हीच्या भाज्या आपण अगदी आवडीने खातो पण त्याच भाज्या घरात केल्या की नाकं मुरडतो. हॉटेलमधील मेथी मटार, मटार पनीर, मिक्स व्हेज अशा भाज्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. हॉटेलमधील रेड आणि ग्रीन ग्रेव्हीच्या भाज्या आपण घरी बनवल्या तर त्याची ग्रेव्ही ही हॉटेलसारखी परफेक्ट होत नाही. हॉटेलमधील या भाज्या चविष्ट होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याची ग्रेव्ही. ग्रेव्ही चवीला खूप छान लागत असेल तर आपण त्यात कोणत्याही भाज्या घालू शकतो(Hotel style all purpose gravy).

हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाज्यांच्या ग्रेव्हीमुळेच त्याला अप्रतिम चव लागते. परंतु अशा ग्रेव्हीच्या भाज्या घरी बनवल्या तर तितक्या चविष्ट होत नाहीत. काहीवेळा ही ग्रेव्ही बनवताना रेसिपी चुकते किंवा हवी तशी परफेक्ट ग्रेव्ही होत नाही. यासाठीच हॉटेलसारखी ग्रेव्ही घरी बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरल्या तर नक्कीच आपण हॉटेलसारखी परफेक्ट (Universal Gravy Base All-Purpose Curry ) ग्रेव्ही घरी बनवू शकतो. हॉटेल सारखी परफेक्ट ग्रेव्ही घरी बनवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या ते पाहूयात(Hotel Style Gravy).

हॉटेलसारखी परफेक्ट ग्रेव्ही घरी बनवण्यासाठी.... 

१. ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा. तुपावर ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद आचेवर ठेवा, ज्यामुळे ग्रेव्हीला रंग आणि स्वाद चांगला येईल. 

२. पालकची ग्रेव्ही तयार करताना पालक गरम पाण्यांत ब्लांच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यांत टाकावा. ज्यामुळे पालकच्या पानांचा हिरवेपणा कायम टिकून राहतो. यामुळे पालकची ग्रेव्ही देखील हिरवीगार होते. 

३. लाल ग्रेव्ही तयार करताना, ग्रेव्हीला चांगला रंग येण्यासाठी पिकलेल्या टोमॅटोचा वापर करावा. जर टोमॅटो संपले असतील तर आपण ग्रेव्ही तयार करताना टोमॅटो केचपचा वापर करु शकता. 

रताळ्याचे कुरकुरीत खमंग काप खाऊन तर पाहा, साधा वरणभात आणि रताळ्याचे काप- पावसाळ्यात मस्त बेत...

४. ग्रेव्हीचा रंग चांगला येण्यासाठी घरगुती किंवा चांगल्या दर्जाच्या मसाल्यांचा वापर करावा. ग्रेव्ही तयार झाल्यावर जेवढा जास्त वेळ जाईल तेवढे मसाले ग्रेव्हीमध्ये चांगले मूरतील. 

५. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावेत. मसाल्यांना तेल सुटलं की मगच भाज्या किंवा इतर साहित्य त्यात घाला. 

६. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखस यांची पेस्ट मिक्स करुन घ्यावी. यामुळे ग्रेव्हीला चांगला दाटसरपणा येतो. 

७. करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. पनीर ग्रेव्हीत घालण्याआधी थोडेसे तेलांत परतून घ्यावे.

आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...

Web Title: Hotel Style Multipurpose Gravy Hotel style Multi purpose style gravy How to Make Homemade Gravy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.