हॉटेलमध्ये दाळ खिचडी, डाळ तडका, दाल फ्राय हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर मागवले जातात. आपल्या रोजच्या जेवणात डाळ भात असतोच. हाच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करून सर्व्ह केला जातो. हे पदार्थ तयार करण्याची पद्धत मात्र खूपच वेगळी असते. (Hotelstyle Moong Dal Tadka) हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना रेसिपी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. मूग डाळ शरीराला पोषण देते आणि पचायला हलकी असते. रेस्टॉरंटस्टाईल मूग दाल तडका करण्याची रेसेपी एकदम सोपी आहे. (Dhaba Style Green Moong Dal Tadka Recipe)
मूगाच्या डाळीच्या सेवनाचे फायदे
१) मूगाच्या डाळीच्या सेवनाने उर्जा मिळते. यात आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटामीन बी कॉम्प्लेक्स आणि प्रोटीन्स असतात. यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
२) मूग डाळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तुम्ही ते स्प्राउट्सच्या स्वरूपात खाऊ शकता.
३) पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मूग डाळीचा समावेश करू शकता. मुगाच्या डाळीनेही पोटाची उष्णता दूर करता येते.
४) मूग डाळीचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत होते.
५) मूग डाळ चयापचय वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, जळजळ आणि अपचनाची समस्या नियंत्रणात राहते.