Lokmat Sakhi >Food > गव्हाची पोळी रोजच खातो, आता त्यात ' या ' ४ पैकी १ पदार्थ मिसळा; हाडे होतील बळकट

गव्हाची पोळी रोजच खातो, आता त्यात ' या ' ४ पैकी १ पदार्थ मिसळा; हाडे होतील बळकट

How can rotis and chapatis be made in a healthy way? : गव्हाच्या पोळीमध्ये १ पदार्थ मिसळल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 02:11 PM2024-06-17T14:11:20+5:302024-06-17T15:31:40+5:30

How can rotis and chapatis be made in a healthy way? : गव्हाच्या पोळीमध्ये १ पदार्थ मिसळल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतील..

How can rotis and chapatis be made in a healthy way? | गव्हाची पोळी रोजच खातो, आता त्यात ' या ' ४ पैकी १ पदार्थ मिसळा; हाडे होतील बळकट

गव्हाची पोळी रोजच खातो, आता त्यात ' या ' ४ पैकी १ पदार्थ मिसळा; हाडे होतील बळकट

आपल्या आहारात कार्ब्स, जीवनसत्त्वे, फायबर आणि इतर पोषक घटकांचा समावेश करायला हवा (Chapati in healthy way). आपण दिवसभरात २ वेळा जेवतो. सकाळचा नाश्ता वगळता, लंच आणि डिनरमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करतो (Health). लंच आणि डिनरमध्ये आपल्या चपाती असतेच (Food). चपातीशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही.

पण गव्हाच्या पोळीला देखील आपण अधिक पौष्टीक करू शकता. गव्हाच्या पोळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. पण फक्त गव्हाची पोळी न खाता आपण त्यात इतर गोष्टी मिसळून अधिक पौष्टीक आणि हेल्दी करू शकता(How can rotis and chapatis be made in a healthy way?).

बाजरीचे पीठ

गव्हाची पोळी खूप पौष्टीक असते. यात फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक आढळतात. पण गव्हाची पोळी अधिक पौष्टीक करण्यासाठी आपण त्यात बाजरीचे पीठ मिक्स करू शकता. बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक मानले जाते.

दिवसातून एकदाच जेवण्याने वजन १०० टक्के घटते, पण तब्येतीवर काय भयंकर दुष्परिणाम होतात पाहा..

बिया आणि नट्स मिक्स करा

गव्हाची पोळी प्रोटीनने परिपूर्ण करायची असेल तर, त्यात काही बिया आणि नट्स मिक्स करा. यातून आपल्याला  प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सही मिळतील. आपण गव्हाच्या पोळीमध्ये भोपळ्याच्या बिया, तीळ, फ्लेक्स सीड्स आणि बदामाचे तुकडे घालून पोळी तयार करू शकता.

दही आणि ताक घालून बनवा पोळी

कणिक मळताना आपण त्यात दही आणि ताक मिक्स करू शकता. यामुळे पोळी अधिक पौष्टीक बनेल. शिवाय आपली पचनसंस्थाही उत्तम राहील. यासाठी कणिक मळताना त्यात पाण्याऐवजी ताक किंवा दह्याचा वापर करा. किंवा पाण्यासोबतही आपण या गोष्टी मिसळू शकता.

जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत

बीटरूट पोळी

गव्हाच्या पोळीला अधिक हेल्दी करण्यासाठी आपण त्यात बीटरूट घालू शकता. यासाठी बीटरूट सोलून धुवा, नंतर पाण्यात उकळवा, किसून पिठात मिक्स करून कणिक मळून घ्या. नंतर त्यात आवडीनुसार मसाले मिक्स करा. यापासून चपात्या बनवा. बीटरूटमध्ये जीवनसत्त्व अ, व क, फायबर, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडीन, लोह असते. ज्यामुळे शरीराला याचा नक्कीच फायदा होईल.

Web Title: How can rotis and chapatis be made in a healthy way?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.