Join us  

डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेने भिजून ओल्या होतात ? ५ सोप्या ट्रिक्स, चपाती सादळणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2024 11:28 AM

1 easy method to prevent the chapati from getting wet : How To keep chapatis in a casserole : गरम चपात्या डब्यांत ठेवल्यास वाफेने ओल्या होऊन सादळतात, असे होऊ नये म्हणून करा सोपी युक्ती...

चपाती हा आपल्या रोजच्या जेवणातील मुख्य पदार्थ आहे. काहींना तर जेवणात चपाती लागतेच, चपाती शिवाय त्यांचे जेवण पूर्ण होऊच शकत नाही. चपात्या  खाताना त्या मऊ आणि गरम असतील तरच त्या खायला चांगल्या लागतात. गार झालेल्या किंवा वातड चपात्या खायला कुणालाच आवडत नाही. काही घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत चपाती लागतेच. अशावेळी घरातील गृहिणी सकाळीच घरातील सगळ्यांना पुरतील इतक्या चपात्या एकदाच बनवून ठेवते. काही स्त्रिया या वर्किंग वुमन असल्याने सकाळचे व रात्रीचे असे दोन्ही वेळचे जेवण एकदाच बनवून ठेवतात. अशावेळी आपण या गरम पोळ्या एका डब्यांत काढून ठेवतो. याचबरोबर काहीवेळा आपण चपात्या गरम राहण्यासाठी कॅसरॉल सारख्या डब्यांचा वापर करतो(How To keep chapatis in a casserole).

जेव्हा आपण गरमागरम चपात्या तव्यावरुन डायरेक्ट काढून डब्यांत ठेवतो तेव्हा त्या गरम वाफेमुळे ओल्या होतात. काहीवेळाने या चपात्यांना पाणी सुटते, पाणी सुटल्याकारणाने चपाती संपूर्ण भिजून ओली होते. अशी वाफेमुळे ओली झालेली चपाती घरातील कोणतीही व्यक्ती खाण्यास तयार होत नाही. तसेच रोज अशा चपात्या ओल्या झाल्याने कुणी खात नसल्याकारणाने वाया जातात, यामुळे अन्नाचे देखील फार नुकसान होते. अशा परिस्थितीत, डब्यांत ठेवलेल्या या चपात्या वाफेमुळे ओल्या होऊ नयेत यासाठी आपण काही टिप्स लक्षात ठेवणार आहोत(How Can We Prevent The Steaming Of  Tiffin When We Put Chapatis In). 

डब्यांत ठेवलेल्या चपात्या ओल्या होऊ नयेत म्हणून... 

१. चपात्या ठेवण्यासाठी आपण जो डबा वापरत आहात तो डबा आकाराने थोडा मोठा असावा. चपातीच्या आकारापेक्षा चपाती ठेवण्याचा डबा मोठा असावा. यामुळे जरी आपण या डब्यांत गरम चपाती ठेवली आणि त्याला पाणी सुटले तरी ते पाणी चपात्यांवर न पडता आजूबाजूला असणाऱ्या असणाऱ्या भागात पडेल. 

२. गरम चपात्या डब्यांत ठेवण्याआधी डब्याच्या तळाशी एखादी जाळीदार डिश ठेवावी. यामुळे जरी गरम चपात्यांना वाफेमुळे पाणी सुटले तरी डब्याच्या तळाशी असणाऱ्या जाळीदार डिशमुळे त्यांचा पाण्याशी संबंध येणार नाही. त्यामुळे डब्याच्या तळाशी एक जाळीदार डिश ठेवून त्यावर एक कॉटनचा रुमाल अंथरून घ्यावा आणि मग त्यावर चपात्या ठेवाव्यात. 

स्वयंपाकासाठी हौशीने आणलेले लाडकाचे-प्लास्टिकचे चमचे धुण्याची १ सोपी युक्ती, तेलकट वास-चिकटपणा गायब...

धुतलेली भांडी ठेवण्याची स्टीलची जाळी अस्वच्छ दिसते? १ भन्नाट ट्रिक, जाळी दिसेल नव्यासारखी चकचकीत...

३. डब्यांत गरम चपात्या ठेवण्याआधी डब्याच्या पृष्ठभागाशी बटर पेपर किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईल घालावे. यामुळे चपात्यांना पाणी सुटले तरी ते पाणी या पेपरद्वारे शोषून घेतले जाईल. यामुळे चपात्या पाणी लागून ओल्या होणार नाहीत. 

४. चपात्या डब्यांत ठेवण्याआधी त्या एका कॉटनच्या रुमालात गुंडाळून मगच डब्यांत ठेवाव्यात. यामुळे जरी गरम वाफेमुळे पाणी सुटले तरीही चपात्या ओल्या होत नाहीत. त्याचबरोबर चपात्या रुमालात गुंडाळून ठेवल्यामुळे दीर्घकाळासाठी मऊ आणि नरम राहतात. 

५. चपात्यांच्या आकारा एवढा अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा तुकडा घेऊन त्यावर थोडेसे तूप लावून ते व्यवस्थित पसरवून घ्यावे. त्यानंतर या फॉईलमध्ये चपात्या गुंडाळून मग डब्यांत ठेवाव्यात. हा उपाय केल्याने चपात्या गरम वाफेमुळे ओल्या होत नाहीत.

कांदा भजी नेहमीचीच, कांद्याच्या पातीची भजी कधी खाल्ली आहेत? खा कुरकुरीत कांदापातीची भजी...

टॅग्स :अन्नकिचन टिप्स