Lokmat Sakhi >Food > सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

Tricks and Tips To Store Dry Coconut : सुकं खोबर व्यवस्थित स्टोअर करून न ठेवल्यास त्याला लगेच कुबट वास येऊन ते चवीने खवट होते, अशावेळी नेमके काय करावे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 01:47 PM2023-07-06T13:47:36+5:302023-07-06T13:58:52+5:30

Tricks and Tips To Store Dry Coconut : सुकं खोबर व्यवस्थित स्टोअर करून न ठेवल्यास त्याला लगेच कुबट वास येऊन ते चवीने खवट होते, अशावेळी नेमके काय करावे ?

How can we store dry coconut for a long time ? 2 easy simple tricks | सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

खोबरं हा आपल्या जेवणात लागणारा रोजचा मुख्य पदार्थ आहे. आपण प्रामुख्याने ओलं व सुक अशा दोन्ही प्रकारच्या खोबऱ्याचा वापर करतो. खोबऱ्याचा वापर केल्याने पदार्थाच्या चवीत भर पडते. खोबरं ओलं असो किंवा सुक ते खवून ठेवलं की आयत्या वेळी स्वयंपाक करताना घाई होत नाही. घाईच्यावेळी असे किसून ठेवलेलं खोबरं लगेच वापरून चटकन स्वयंपाक करता येतो. असे हे खोबरं खवून एका हवाबंद डब्यांत भरून ठेवले की ते बराच काळ टिकते. परंतु काहीवेळा हे खोबरं व्यवस्थित स्टोअर करून ठेवले नाही तर खवट होते. शक्यतो सुक खोबरं हे नीट स्टोअर करून ठेवले नाही तर ते लगेच खराब होण्याची जास्त शक्यता असते. 

स्वयंपाक घरातले पदार्थ योग्य पद्धतीने साठवून ठेवायचे, हे खरं तर खूपच कौशल्याचं काम असत. त्यात जरा जरी चूक झाली तरी पदार्थ खराब होतो आणि मग पैसेही वाया जातात. त्यातल्या त्यात रवा, खोबरं (storage of dry coconut) हे पदार्थ सांभाळायचे म्हणजे आणखीनच बारकाईने करण्याचं काम. सुक खोबरं नीट साठवून ठेवलं नाही तर सुक्या खोबऱ्याला अगदीच कुबट, खवट वास येऊ लागतो. यासाठीच सुकं खोबरं योग्य पद्धतीने कसे साठवून ठेवायचे, जेणेकरून ते महिनोंमहिने चांगले राहतील, याची माहिती घेणार आहोत(How can we store dry coconut for a long time ? 2 easy simple tricks).

सुकं खोबरं खवट होऊ न देता अनेक महिने चांगले टिकवून ठेवण्यासाठी प्रमुख दोन घरगुती उपाय :- 

१. बाजारातून जेव्हा सुक्या खोबऱ्याची वाटी आणली जाते तेव्हा आपण ती जशीच्या तशीच उचलतो आणि डब्यात ठेवून देतो. यामुळेच बऱ्याचदा खोबरं खराब होतं. म्हणून खोबरं भरून ठेवण्याआधी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर खोबऱ्याच्या वाट्या एखादा तास एखाद्या कागदावर पसरून ठेवा. त्यानंतर एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्या आणि त्यात एक ते दिड टेबलस्पून मीठ टाका. मीठ पाण्यात व्यवस्थित विरघळू द्या. यानंतर एखाद्या स्वच्छ नॅपकीनचे टाेक मिठाच्या पाण्यात बुडवा आणि त्याने सुक्या खोबऱ्याची वाटी आतून- बाहेरून पुर्णपणे पुसून घ्या. यानंतर खोबरं थोडं सुकू द्या. खोबरं सुकल्यानंतर एका कपमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल घ्या आणि ते बोटाने किंवा कॉटनच्या कपड्याने खोबऱ्याच्या वाटीला आतून बाहेरून लावा. एका खोबऱ्याच्या वाटीला तेलाने किमान अर्धा मिनिट तरी चोळावे. यानंतर तेल लावलेल्या सगळ्या खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हात २ दिवस वाळू द्या. त्यानंतर त्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरा. पिशवीचे तोंड गाठ मारून किंवा रबर लावून पुर्णपणे पॅक करा. ही पिशवी स्टीलच्या हवा बंद डब्यात ठेवून द्या. अशा पद्धतीने ठेवलेलं खोबरं पुढील कित्येक महिने खराब होणार नाही. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

२. सुकं खोबरं साठविण्यासाठी तुरटीचाही वापर करता येतो. यासाठी एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्या. त्यात १ टेबलस्पून तुरटी टाका. तुरटी पाण्यात पुर्णपणे विरघळली की स्वच्छ नॅपकीनचे एक टोक त्या पाण्यात बुडवा आणि खोबऱ्याची वाटी आतून- बाहेरून पुसून घ्या. आता अशी खोबऱ्याची वाटी दोन दिवस उन्हामध्ये वाळू द्या. यानंतर ऊन दाखवलेले खोबरे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरा. पिशवीचे तोंड गाठ मारून किंवा रबर लावून पुर्णपणे पॅक करा. ही पिशवी स्टीलच्या हवा बंद डब्यात ठेवून द्या.

स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...

 

Web Title: How can we store dry coconut for a long time ? 2 easy simple tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न