Lokmat Sakhi >Food > बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात फरक काय असतो ? ओळखायचे कसे, चुकून भलतेच वापरले तर...

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात फरक काय असतो ? ओळखायचे कसे, चुकून भलतेच वापरले तर...

What's the difference between baking soda and baking powder ? : बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मधील फरक लक्षात न आल्याने कोणत्या पदार्थात नेमके काय घालावे समजत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 07:42 PM2023-08-30T19:42:32+5:302023-08-30T20:02:32+5:30

What's the difference between baking soda and baking powder ? : बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मधील फरक लक्षात न आल्याने कोणत्या पदार्थात नेमके काय घालावे समजत नाही...

How can you tell the difference between baking soda and baking powder? | बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात फरक काय असतो ? ओळखायचे कसे, चुकून भलतेच वापरले तर...

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात फरक काय असतो ? ओळखायचे कसे, चुकून भलतेच वापरले तर...

रोजचा स्वयंपाक करताना तो स्वादिष्ट व्हावा यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस घालतो. या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, बेकिंग सोडा, पावडर यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. स्वयंपाकघरात इडली, डोसा किंवा ढोकळा यांसारखे पदार्थ असोत किंवा केक, बिस्कीट यांसारखे बेकरी प्रॉडक्ट असोत बेकींग सोडा आणि बेकींग पावडर आपण वापरतो. पण बेकींग सोडा म्हणजेच बेकींग पावडर असा काही जणांचा समज असतो. एखादवेळी घरात सोडा नसेल तर त्याऐवजी पावडर वापरु किंवा पावडर नसेल तर सोडा वापरुया असं आपल्याला वाटतं मात्र या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यातील फरक समजून घेणे आणि त्यानुसार त्याचा वापर करणे गरजेचे असते. या दोन्हीचे केमिकल कॉम्बिनेशन वेगळे असून त्याचे उपयोगही वेगळे असतात(How can you tell the difference between baking soda and baking powder?).

केक, पाव किंवा बेकिंगशी निगडीत काहीही पदार्थ बनवण्याची ज्यावेळी वेळ येते, त्यावेळी काही जिन्नस अगदी हमखास त्या पदार्थांमध्ये घालावे लागतात. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे तर बेकिंग करताना घालावेच लागतात. अगदी चिमुटभर लागणारी ही गोष्ट. काही खाद्यपदार्थांमध्ये फारच महत्वाची असते. पण अनेकांना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकच वाटते किंवा या दोघांपैकी एक कोणतीही पदार्थामध्ये घातली तरी चालेल असे वाटते. असे होऊ नये म्हणून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यातील फरक समजून घेऊयात(What's the difference between baking soda and baking powder?)  

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर या दोन्हीचा वापर का करतात ?
 
बेकिंग सोडा (Baking Soda) आणि बेकिंग पावडर (Baking Powder) हे दोन्ही कोणताही पदार्थ फुलवून आणण्यासाठी त्यात घातले जातात. हेच कारण आहे की दोघांच्या वापराबद्दल अनेकदा आपण गोंधळलेले असतो. हे जेव्हा जेव्हा एखाद्या पदार्थात घालतात तर ते फसफसून पदार्थात जाळी पाडून फ्लफी बनवतात.

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!

कसं ओळखावं की कोणता बेकिंग सोडा (Baking Soda) आहे आणि कोणती बेकिंग पावडर (Baking Powder) ? 

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मधील फरक ओळखण्याच्या दोन पद्धती आहेत. बेकिंग पावडर आपण बोटांच्या मध्ये ठेवल्यावर झटकारून दिल्यावर हे हाताला चिटकेल. याउलट बेकिंग सोडा थोडा दाणेदार असतो आणि हे बोटांवर ठेवून दिल्यास बोटाला चिटकत नाही. बेकिंग पावडर मध्ये कोमट पाणी टाकल्यावर बुडबुडे येतात, परंतु बेकिंग सोड्याच्या बाबतीत असे होत नाही ते पाणी मिळविल्यावर कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देत नाहीत त्याला फसफसण्यासाठी कोणत्यातरी आंबट पदार्थाची गरज असते. 

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

बेकिंग सोडा (Baking Soda) कोणत्या पदार्थात वापरावा ?

बेकिंग सोडा नेहमी त्याच पदार्थांमध्ये वापरतात ज्यांच्यासाठी इन्स्टंट फर्मेंटेशन हवे असते. जसे की, भजी, ढोकळे, पकोडे इत्यादी. जेव्हा आपल्याला फक्त बॅटर घोळल्यावर इंस्टेंट्ली किंवा १० मिनिटातच अन्न शिजवायचे आहे तेव्हा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो.  

भेंडी हिरवीगार ताजी राहावी म्हणून ४ सोप्या टिप्स, फ्रिजमध्ये ठेवून भेंडी काळी पडणार नाही-सुकणार नाही...
 


 रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...
 

बेकिंग पावडर (Baking Powder) कोणत्या पदार्थात वापरावी ? 

बेकिंग पावडर वापरण्याची पद्धत वेगळी आहे. हे त्या पदार्थात वापरतात ज्यांच्यामध्ये त्या पदार्थांचे बॅटर किंवा पीठ फुलून येण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. जसे की, केक इत्यादींचे बॅटर तयार करायचे असो, किंवा भटोऱ्यांसाठी कणीक मळावयाची असो अशावेळी बेकिंग पावडरचा वापर केला जातो. बेकिंग पावडर नेहमी त्याच पदार्थात वापरावं ज्यामध्ये पदार्थ फुलून येण्यासाठी थोडी वाट पाहिली जाते. असे बरेच पदार्थ आहे की ज्यांच्यामध्ये, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर हे दोन्ही पदार्थ वापरले जातात जसे की ब्रेड किंवा पिझ्झ्याची कणीक.

Web Title: How can you tell the difference between baking soda and baking powder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.