खजूर आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र खजूर उष्ण असल्याने उन्हाळ्यात किंवा अन्य काही वेळा आपण खजूर खाणे टाळतो. खजूर थंड आणि शरीराला कूलिंग इफेक्ट देणारे असतात हे आपल्यातील अनेकांना माहित नसेल. उपवासाला किंवा काही वेळा एरवीही आपण फळांच्या किंवा सुकामेव्याच्या ऐवजी खजूर खातो. पण खजूरामध्ये असणारे गुणधर्म आपल्याला पूर्णपणे माहित असतातच असे नाही. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी खजूर आरोग्याच्या कोणत्या तक्रारींसाठी उपयुक्त असतो आणि त्यात काय गुणधर्म असतात आणि ते कशापद्धतीने खायला हवेत याविषयी सांगितले आहे (How Dates Are Useful for Health Issues and How Should One have Khajoor ).
खजूराचे गुणधर्म
१. रस (स्वाद) - गोड
२. गुण (उपयुक्तता) - गुरु (पचण्यास जड), स्निग्ध (दिसायला लहान)
३. विपक (पचनानंतरचा गुणधर्म) - गोड
४. वीर्य (सामर्थ्य) - थंड
५. कर्म (कार्य) - वातपित्त शामक (ताकद वाढवून वात आणि पित्तदोष कमी करणारे)
आरोग्यासाठी उपयुक्तता
१. बद्धकोष्ठतेपासून सुटका
२. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर
३. चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी
४. हाडांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी
५. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी
६. स्त्री-पुरूष दोघांमधील लैंगिक ताकद वाढण्यासाठी
७. मेंदूचे कार्य चांगले ठेवण्यासाठी
८. थकवा दूर करण्यासाठी
९. अॅनिमियासाठी उपयुक्त
१०. वजनवाढीसाठी फायदेशीर
११. मूळव्याधीसाठी प्रतिबंधक
१२. जळजळ कमी होण्यास फायदेशीर
१३. गर्भधारणा चांगला व्हावी म्हणून उपयुक्त
१४. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
खजूर केव्हा आणि कसे खावेत ?
१. सुरुवातीला तुम्ही २ खजूर खाऊ शकता, मात्र तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर ४ खजूर खाल्ले तरी चालतील.
२. सकाळी रीकाम्या पोटी, मधल्या वेळेचा स्नॅक म्हणून किंवा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा खजूर खायला हवेत.
३. वजन वाढीसाठी डाएट करत असाल तर रात्री झोपताना तूप आणि खजूर खायला हरकत नाही.
४. खजूर कायम भिजवून खावेत, त्यामुळे ते पचायला तर सोपे होतातच पण त्यातील टॅनिन आणि इतर अॅसिड निघून जाण्यास मदत होते.
५. साधारणपणे खजूर रात्री झोपताना म्हणजे ८ ते १० तासांसाठी भिजवल्यास ते पचायला हलके होतात.
६. लहान मुलांमध्ये तब्येत सुधारण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खजूर खाणे फायद्याचे ठरते. ज्यांचे वजन कमी आहे, प्रतिकारशक्ती आणि हिमोग्लोबिन कमी आहे अशा मुलांना आवर्जून खजूर द्यायला हवेत.