Join us  

चकली तळताना तुटते, गार झाल्यावर खूप तेल सोडते? १ सोपी ट्रिक, चकल्या तेल पिणार नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2023 1:29 PM

How do avoid the breaking/melting of chaklis while frying : संपेपर्यंत मऊ पडणार नाही, अशी खुसखुशीत भाजणीची चकली एकदा करून पाहाच..

दिवाळी (Diwali) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आधी येतो तो फराळ. करंजी, चिवडा, शंकरपाळे, लाडू, चकली हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण सगळ्यांना जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे चकली. आणि घरात सर्वात आधी चकलीचाच डबा संपतो. त्यामुळे कितीही किलोची चकली केली तर, ती लवकर संपते. चकली अनेक प्रकारची केली जाते. काहींकडे भाजणी, पोहे, तांदळाची चकली केली जाते. मात्र, भाजणीची चकली अनेकदा तुटते.

तेलात व्यवस्थित फुलत नाही. किंवा चकली स्टोअर करून झाल्यानंतर त्यामधून तेल सुटते, किंवा लवकर मऊ होते. चकली मऊ झाल्यानंतर ती खाल्ली जात नाही. जर आपल्या चविष्ट, कुरकुरीत, चवदार भाजणीची चकली करायची असेल तर, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. यातील टिप्समुळे चकली अधिक काळ कुरकुरीत राहील(How do avoid the breaking/melting of chaklis while frying).

चकली तयार करण्यासाठी भाजणी कशी तयार करायची

साहित्य

एक किलो तांदूळ

२०० ग्रॅम हरभऱ्याची डाळ

२०० ग्रॅम मुग डाळ

२०० ग्रॅम साबुदाणा

१०० ग्रॅम गहू

१०० ग्रॅम उडीदाची डाळ

नाचणीची इडली कधी खाल्लीय का? कपभर डाळ-तांदूळ-नाचणीची करा पौष्टीक इडली, हेल्दी नाश्ता-आवडेल प्रत्येकाला

१०० ग्रॅम पोहे

४० ग्रॅम जिरं

४० ग्रॅम धणे

कृती

सर्वप्रथम, एक किलो तांदुळामध्ये पाणी घालून धुवून घ्या. धुतलेले तांदूळ एका चाळणीत ठेवा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. नंतर इतरही धान्य धुवून घ्या, व चाळणीत पसरवून ठेवा. जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. नंतर वेगवेगळ्या कॉटनच्या कापडावर धान्य रात्रभरासाठी पसरवून ठेवा. धान्य सुकल्यानंतर प्रत्येकी वेगवेगळ्या बाऊलमध्ये ठेवा.

एक मोठी कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात तांदूळ घालून मंद आचेवर भाजून घ्या. नंतर इतरही धान्य भाजून घ्या, व सर्व धान्य एकत्र मिक्स करा. मिक्स केल्यानंतर थंड होण्यासाठी एका कापडावर पसरवून ठेवा. शेवटी हे सर्व धान्य बारीक दळून आणा.

भाजणीची खुसखुशीत चकली करण्याची योग्य पद्धत

साहित्य

तयार भाजणी

पांढरे तीळ

ओवा

मीठ

लाल तिखट

तेल

पाणी

कृती

तळकट म्हणून शंकरपाळे खाणं टाळताय? तेलाचा एक थेंबही न वापरता-कढईत तयार करा खुसखुशीत शंकरपाळे

सर्वप्रथम एका परातीत ४ वाटी भाजणीचं पीठ घ्या. नंतर त्यात ३ टेबलस्पून भाजलेले पांढरे तीळ, एक चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि अडीच टेबलस्पून लाल तिखट घालून साहित्य चमच्याने एकत्र करा. नंतर त्यात पाव वाटी गरम तेल घालून चमच्याने मिक्स करा. पीठ थोडं थंड झाल्यानंतर त्यात गरजेनुसार कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या. ज्याप्रमाणे आपण चकली तयार करण्यासाठी पीठ मळतो, त्याचप्रमाणे पीठ मळायचे आहे. जेणेकरून चकल्या खुसखुशीत काटेरी तयार होतील.

कणिक मळून झाल्यानंतर चकलीच्या साच्याला तेल लावून घ्या, नंतर त्यात हवा शिरायलाही आत जागा नसेल या पद्धतीने पीठ दाबून भरून घ्या. सोरा जास्त उंच किंवा जास्त खाली न धरता मधोमध धरा. नंतर एका ताटात किंवा पेपरवर चकल्या पाडून घ्या. चकलीचे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक दाबून घ्या, जेणेकरून चकली तेलात फुटणार नाही. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर चकल्या सोनेरी येईपर्यंत तळून घ्या.

तळलेल्या चकल्या एका टिश्यूपेपरवर काढून ठेवा. जेणेकरून त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल. चकली थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा कृतीने चकली तयार केल्यास त्यातून तेल निघणार नाही, किंवा लगेच मऊ पडणार नाही. 

टॅग्स :दिवाळी 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.