किचनमधील कामं अधिक सुखकर व्हावी, यासाठी अनेक उपकरणांचा वापर केला जातो. कामं झटपट व्हावी, यासाठी आपण अनेक आयडियाज लावून किचनमधील कामं भरभर आटोपण्याचा प्रयत्न करतो. जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी आपण अनेकदा बिर्याणी, पास्ता, नूडल्स हे पदार्थ करतो. हे पदार्थ करताना खूप मेहनत घ्यावी लागते.
मुख्य म्हणजे आपण जेव्हा बिर्याणीसाठी राईस शिजवून घेतो, तेव्हा त्यातील अतिरिक्त पाणी काढून घेतो. पाणी चाळणीतून काढताना त्यातून पाण्यासकट शिजलेला भात, नूडल्स आणि पास्ता देखील पडतो. ज्यामुळे अन्नाची नासाडी होते. ही परिस्थिती भाजी धुताना देखील होते. भाजी धुण्यासाठी आपण चाळणीचा वापर करतो, पण त्यातून पाणी काढताना अर्धी भाजी खाली पडते. जर अन्नाची नासाडी होऊ असे वाटत असेल तर, चाळणीची नवी ट्रिक वापरून पाहा, या ट्रिकमुळे अन्नाची नासाडी होणार नाही. व पाणी देखील संपूर्ण निघून जाईल(How do you drain water from cooked rice?).
चाळणीतून पाणी काढण्याची भन्नाट ट्रिक
पदार्थातून अतिरिक्त पाणी काढण्यासाठी लोकं चाळणीचा वापर करतात. चाळणीमधून पदार्थ व पाणी वेगळे होते. पदार्थातून अतिरिक्त पाणी काढण्यासाठी, बहुतांश लोकं चाळणी खाली ठेऊन त्यातून पाणी गाळण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे पाण्यासकट अन्न देखील खाली पडते. ज्यामुळे अन्नाची नासाडी होते.
१ वाटीभर भिजलेल्या हरबऱ्याचा पौष्टिक डोसा, वजन कमी करायचं तर नाश्त्याला खा ‘चना डोसा!’
२ चमचे तांदळाची करा इन्स्टंट खीर, १५ मिनिटांत मस्त गोड खिर तय्यार, चवीलाही बेस्ट
अन्नाची नासाडी होऊ नये, असे वाटत असेल तर, चाळण भांड्यावर ठेवा, व अतिरिक्त पाणी काढून टाका. अशा प्रकारे पदार्थामधून अतिरिक्त पाणी निघून जाईल. व अन्नाची नासाडी देखील होणार नाही. व झटपट काम पूर्ण होईल.