Join us  

नारळ फोडून फ्रिजमध्ये ठेवण्याच्या 2 सोप्या ट्रिक, नारळ खराब होणार नाही, बुरशीही लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2023 1:09 PM

How do you keep an open coconut fresh in the fridge? ओले खोबरे लवकर खराब होऊ नये म्हणून सोपे उपाय

स्वयंपाक घरातील पदार्थ साठवून ठेवणं हे खरंच कौशल्याचं काम आहे. ऋतूनुसार किचनमधील इतर साहित्य खराब होण्याची शक्यता वाढते. त्यात खोबरं सहसा प्रत्येक घरात वापरला जातो. खोबऱ्याचा वापर पदार्थात केल्याने जेवणाची चव वाढते. ओलं असो किंवा सुकं, किसून किंवा त्याची पेस्ट तयार करून खोबऱ्याचा वापर केला जातो.

पण उरलेल्या ओल्या खोबऱ्याची करवंटी फ्रिजमध्ये ठेवल्याने ती लवकर खराब होते. खोबरं काळपट किंवा त्यावर बुरशी तयार होते. यासह खोबऱ्यातून उग्र - कुबट वास येतो. ज्यामुळे हे खोबरं पदार्थात घालताच, पदार्थाची चव बिघडते. ओलं खोबरं जास्त दिवस टिकून राहावे, यासह त्यावर बुरशी तयार होऊ नये यासाठी या २ ट्रिक्सचा नक्की वापर करून पाहा(How do you keep an open coconut fresh in the fridge?).

ओलं खोबरं फ्रिजमध्ये अधिक दिवस टिकावे म्हणून उपाय

अनेकदा खोबऱ्याची अर्धी करवंटी शिल्लक राहते. खोबऱ्याची करवंटी लवकर खराब होऊ नये, म्हणून आपण करवंटी फ्रिजमध्ये ठेवतो. पण अधिक काळ करवंटी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते. अशावेळी ही ट्रिक वापरून पाहा. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या, त्यात थोडंसं मीठ घालून पाण्यात मिक्स करा. आता त्यात खोबऱ्याची करवंटी काही वेळेसाठी भिजत ठेवा. १० मिनिटे झाल्यानंतर खोबऱ्याची करवंटी पाण्यातून काढून फ्रिजमध्जे ठेवा. मिठाच्या पाण्यामुळे करवंटीवर बुरशी तयार होत नाही. 

चपात्या कडक-वातड होऊ नयेत म्हणून ४ टिप्स, सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील मऊ

ओलं खोबऱ्याचे काप झिप झिप लॉकमध्ये साठवून ठेवा

सर्वप्रथम, ओलं खोबरं धुवून, सुक्या कपड्याने पुसून काढा. व त्याचे छोटे काप करून घ्या. खोबऱ्याचे काप केल्यानंतर एका झिप लॉकमध्ये साठवून फ्रिजमध्ये ठेवा. व जेव्हा वापरायचे असेल तेव्हा फ्रिजमधून काढून त्याचा वापर करा.

पावसाळ्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? १० मिनिटात करा स्पंजी गुलगुले, गोड आणि पौष्टिकही

जर आपल्याकडे झिप लॉक नसेल तर, सामान्य पिशवीचा वापर करा. व त्यात ओल्या खोबऱ्याचे काप साठवून ठेवा. यामुळे त्यावर बुरशी तयार होणार नाही.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.