Lokmat Sakhi >Food > मस्त पिवळाधम्म दिसणारा आंबा आतून सडलेला नाही, कसं ओळखाल? ही पाहा भन्नाट व्हायरल ट्रिक

मस्त पिवळाधम्म दिसणारा आंबा आतून सडलेला नाही, कसं ओळखाल? ही पाहा भन्नाट व्हायरल ट्रिक

How do you know if a mango that looks yellow is not rotten inside? Watch this amazing viral trick आंबा बाहेरून मस्त पण आतून खराब निघतो. असा आंबा ओळखण्याची ही पाहा पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 08:30 IST2025-04-10T08:25:04+5:302025-04-10T08:30:02+5:30

How do you know if a mango that looks yellow is not rotten inside? Watch this amazing viral trick आंबा बाहेरून मस्त पण आतून खराब निघतो. असा आंबा ओळखण्याची ही पाहा पद्धत.

How do you know if a mango that looks yellow is not rotten inside? Watch this amazing viral trick | मस्त पिवळाधम्म दिसणारा आंबा आतून सडलेला नाही, कसं ओळखाल? ही पाहा भन्नाट व्हायरल ट्रिक

मस्त पिवळाधम्म दिसणारा आंबा आतून सडलेला नाही, कसं ओळखाल? ही पाहा भन्नाट व्हायरल ट्रिक

सध्या घरोघरी आंब्याचे पदार्थ केले जात आहेत. आता पुढचे काही महिने आंबाच खायचा. मुळात लोकांना आंबा प्रचंड आवडतो. मात्र वर्षातून एकदाच खाता येतो. (How do you know if a mango that looks yellow is not rotten inside? Watch this amazing viral trick)त्यामुळे सिझनमध्ये मनसोक्त खाऊन घ्यायचा. नंतर पुन्हा वर्षभराने खायला मिळतो. विविध प्रकारचे आंबे बाजारात मिळतात. आंब्याला प्रचंड मागणी असते. त्यामुळे आंब्याची निर्यातही भरपूर प्रमाणात केली जाते. आंब्याच्या किंमती तर ढगाला टेकलेल्या आहेत. आंबा प्रचंड महाग विकला जातो. घरी आणलेल्या आंब्याची पेटी उघडल्यावर बरेचदा त्यातील काही आंबे खराब निघतात. (How do you know if a mango that looks yellow is not rotten inside? Watch this amazing viral trick)दिसायला अगदी सुंदर असतात. एकही डाग नसलेला आंबाही आतून खराब निघतो. मग चांगला आंबा ओळखणार कसा? जर बाहेरूनही तो आंबा छान असेल तर आत कसा आहे हे ओळखण्यासाठी काय करावे? अगदीच सोपी पद्धत आहे. पाहा काय कराल.

आंबेवाल्याला कधी आंबा विकताना निरखून पाहिलेत, तर लक्षात येईल की तो आंबा विकताना आंबा बोटाने दाबून बघतो. मगच विकतो. आंब्याला खालच्या बाजूला एक टोक असते. त्या टोकामुळे आंबा चांगला आहे का, सडलेला आहे हे ओळखता येते. अगदी सोपी पद्धत आहे.

आंबा हातात घ्यायचा. चारही बाजूंनी दाबून बघायचा मऊ आहे का टणक आहे ते पाहायचे. आंब्याचे बाहेर आलेले टोक बोटाने जरा जोर देऊन दाबायचे. असे केल्यावर जर आंबा पुन्हा पूर्ववत झाला तर तो आंबा नक्कीच आतून खराब आहे. त्या आंब्यावर बोटाचा छाप राहणार नाही. आंबा जर चांगला असेल तर मग आंब्याच्या टोकाजवळ बोटाने दाबल्यावर बोटाचा ठसा उठतो. मऊ लागतो. आंब्याचा बोटामुळे दाबला गेलेला भाग दबलेलाच राहतो. असे झाले तर मग तो आंबा नक्की विकत घ्या. तो चांगलाच निघेल.

आंब्यावर डाग असले म्हणजे आंबा खराब आहे असे होत नाही. आंबा चांगला आहे का नाही ते तपासण्यासाठी ही पद्धत वापरून बघा. नक्कीच फायदा होईल. पुन्हा चुकून खराब आंबा विकत घेतला गेला, असे होणारच नाही.        

Web Title: How do you know if a mango that looks yellow is not rotten inside? Watch this amazing viral trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.