Lokmat Sakhi >Food > मुळ्याला येणारा उग्र वास, कडवटपणा - तिखटपणा होईल मिनिटांत दूर, सोपे ४ उपाय...मुळाही खाल आवडीने...

मुळ्याला येणारा उग्र वास, कडवटपणा - तिखटपणा होईल मिनिटांत दूर, सोपे ४ उपाय...मुळाही खाल आवडीने...

How can you get rid of the smell of raw turnips or radishes without washing them first : मुळ्याला येणारा उग्र वास व त्याची कडवट चव यामुळे मुळा खाणे नकोसे वाटते, त्यासाठीच हे काही सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 03:59 PM2023-11-17T15:59:55+5:302023-11-17T17:18:15+5:30

How can you get rid of the smell of raw turnips or radishes without washing them first : मुळ्याला येणारा उग्र वास व त्याची कडवट चव यामुळे मुळा खाणे नकोसे वाटते, त्यासाठीच हे काही सोपे उपाय...

How do you make radishes less bitter, Easy trick How to remove bitterness from radish | मुळ्याला येणारा उग्र वास, कडवटपणा - तिखटपणा होईल मिनिटांत दूर, सोपे ४ उपाय...मुळाही खाल आवडीने...

मुळ्याला येणारा उग्र वास, कडवटपणा - तिखटपणा होईल मिनिटांत दूर, सोपे ४ उपाय...मुळाही खाल आवडीने...

सध्या हिवाळा ऋतूंत बाजारांत सगळीकडे पांढराशुभ्र मुळा फार मोठ्या प्रमाणांत विकायला ठेवलेला दिसतो. आपल्या घरात भाज्यांपैकी काही भाज्या अशा असतात की त्या आवडीने खाल्ल्या जात नाहीत. कडू कारले, मेथी, दुधी, शेपू, मुळा अशा काही ठराविक भाज्या या आपल्याला खायला आवडत नाहीत. या भाज्यांची लागणारी वेगळीच चव किंवा त्यांना येणारा उग्र वास यामुळे अशा भाज्या खाव्याशा वाटत नाही. मुळा ही त्यापैकी एक बहुतेकजणांची नावडती भाजी आहे. आपल्यापैकी बरेचजण मुळा खाण्यासाठी नाक मुरडतात. मुळ्याची भाजी शिजवताना येणारा उग्र सुवास तसेच त्याची लागणारी थोडीशी कडवट चव यामुळे तो खावासा वाटत नाही(How to remove bitterness from radish).

महाराष्ट्रात भाजी - भाकरी किंवा पिठलं भाकरीसोबत कांदा - मुळा खूप आवडीने खाल्ला जातो. अनेकजण मुळ्याची भाजी, मुळ्याचे पराठे, मुळ्याची कोशिंबीर असे अनेक पदार्थ बनवतात. परंतु मुळा ही अशी भाजी आहे की, तिच्या येणाऱ्या उग्र वासाने किंवा चवीमुळे ती खावीशी वाटत नाही. असे असले तरीही मुळा व मुळ्याची पाने आरोग्यासाठी गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आपल्याला होतो. मुळ्यात भरपूर प्रमाणांत जीवनसत्वे असतात, मुळा खाल्ल्याने ते आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरते. मुळा हा साधारणतः सॅलड किंवा भाजी अशा दोन्ही प्रकारे खाल्ला जातो. असे असले तरीही मुळ्याचे काही पदार्थ बनवताना त्याचा उग्र वास हा काही केल्या येतोच. मुळ्याचा हा उग्र वास व कडवट चव घालवण्यासाठी काही सोपे उपाय लक्षात ठेवूयात(Easy trick How to remove bitterness from radish).

मुळ्याचा उग्र वास व कडवट चव घालवण्यासाठी... 

१. मुळ्याच्या बाहेरच्या सालीत कडवटपणा हा जास्त प्रमाणांत असतो. सालीतील हा कडवटपणा दूर करण्यासाठी मुळा कापण्याआधी त्याची साल काढायला विसरु नका. या सालीतच फार मोठ्या प्रमाणांत कडवटपणा असतो. त्यामुळे मुळ्याचे कोणतेही पदार्थ बनवताना त्याची साल काढून घेणे गरजेचे असते. मुळ्याची साल काढण्याआधी तो अर्धा तास पाण्यांत भिजवून ठेवणे गरजेचे असते. यामुळे त्याचा कडवटपणा लगेच दूर होण्यास मदत मिळते. 

२. मुळ्याची साल काढून झाल्यानंतर देखील त्याचा कडवटपणा कमी झाला नसेल तर थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करावा. मुळ्याची साल काढल्यानंतर तो अर्ध्या तासासाठी थंड पाण्यात किंवा बर्फाच्या पाण्यांत भिजत ठेवावा. मुळ्याच्या सालीत असणाऱ्या तिखटपणाचे एंजाइम निष्क्रिय करण्यासाठी थंड पाणी व बर्फ फायदेशीर ठरते. 

रोजच्या आहारातील हे ६ पदार्थ शिजवून खाणे टाळाच, त्यातील पोषणमूल्य होईल कमी...

गारठ्याच्या थंडीत घरगुती आवळा कँडी खाऊन ठेवा स्वतःला फिट अँड फाईन, घ्या आवळा कँडीची सोपी रेसिपी...

३. मुळ्याच्या भाजीतील कडवटपणा किंवा तिखटपणा दूर करण्यासाठी आपण मिठाचा वापर करु शकता. यासाठी मुळा सर्वप्रथम सोलून त्याचे साल काढून घ्यावे. साल काढून घेतल्यानंतर या मुळ्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. या तुकड्यावर मीठ घालावे. या तुकड्यांना मीठ चोळून ते पुढील अर्ध्या तासासाठी असेच ठेवून द्यावे. त्यानंतर याला पाणी सुटेल हे पाणी फेकून द्यावे, व मुळा परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. 

४. वेगवेगळे पदार्थ बनवताना आपण व्हिनेगरचा वापर हा आवर्जून करतोच. काही ठराविक पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण त्यात व्हिनेगर घालतो. याचप्रमाणे मुळ्याच्या भाजीचा कडवटपणा किंवा तिखटपणा दूर करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करावा. मुळ्याचे लहान लहान तुकडे करून ते व्हिनेगरमध्ये अर्धा तास बुडवून ठेवावे. यामुळे मुळ्याच्या भाजीचा कडवटपणा, तिखटपणा व उग्र वास नाहीसा होण्यास मदत मिळते.

Web Title: How do you make radishes less bitter, Easy trick How to remove bitterness from radish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.