आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात सकाळच्या नाश्त्याला उपमा अगदी आवडीने खाल्ला जातो. घाईगडबडीच्या वेळी झटपट रेडी होणारा नाश्ता म्हणजे उपमा. उपमा तयार करताना आपण त्यामध्ये अनेक भाज्या, मसाले घालून तो अधिक पौष्टिक करु शकतो. हा पांढराशुभ्र उपमा घरांतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. उपमा करायला सोपा असला तरीही काहीवेळा गडबड (How to avoid lumps in Vegetable Upma) होऊन उपमा फसतो. कधी त्यात पाणी जास्त होऊन तो गिचका होतो. तर कधी अगदीच कोरडा होतो. असा उपमा खायला कुणालाच आवडत नाही(How to make Upma without lumps).
उपमा जर परफेक्ट रवाळ असेल तरच तो खाण्यात मजा येते. हॉटेलमध्ये किंवा उडपी स्टॉलवर विकत मिळणारा उपमा घरी तयार केला तर तसाच परफेक्ट होत नाही. नाश्त्यात (Making Upma and avoiding lumps) काहीतरी हलके - फुलके आणि टेस्टी करायचे असेल तर आपण हमखास उपमा तयार करतो. रवा उपमा चवदार आणि आरोग्यासाठी उत्तम नाश्ता आहे. रवा उपमा बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असे केल्याने रवा उपमा स्वादिष्ट बनतो. उपमा तयार करताना तो गिचका किंवा फडफडीत होऊ नये यासाठी काही टिप्स फॉलो करुयात. यामुळे तुमचा उपमा उडपी स्टॉलवर विकत मिळतो तसा अगदी परफेक्ट रवाळ होईल(The secret to make soft, delicious & lump free Upma).
परफेक्ट उपमा करण्यासाठी खास टिप्स...
१. उपमा करायचा असेल तेव्हा रव्याची निवड करताना बारीक रवा निवडावा. उपम्यासाठी रवा भाजत असताना तो मंद आचेवरच भाजावा नाहीतर रवा पटकन जळतो. याशिवाय भाजतानाही त्यात गुठळ्या होऊ देऊ नये. उपमा करताना घरात जो रवा असेल तोच सरसकट घेतला जातो परंतु असे करु नका, उपमा करताना शक्यतो बारीक रवाच निवडा. बारीक रवा हा पटकन भाजला जातो आणि उपमा चविष्ट व मऊसर, रवाळ होतो.
२. तुम्ही रवा किती वाटी घेत आहात यावर तुमच्या पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. आपण जर एक वाटी रवा घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला दुप्पट म्हणजेच दोन वाटी पाणी लागते. हे पाण्याचे प्रमाण नेहमी लक्षात ठेवा.
पावसाळ्यात भाज्या नीट धुतल्या नाहीतर पडाल आजारी, भाज्या धुण्याची सोपी पद्धत...
३. उपमा करताना त्यात गुठळ्या तयार होऊ नये म्हणून, कढईतल्या गरम पाण्यांत भाजलेला रवा घालताना तो एकदम घालू नये. हळुहळु घालावा. तसेच कढईत थोडा थोडा रवा घातला की कढईतलं सगळं मिश्रण हलवून घ्यावे. यासाठी इतर कोणताही चमचा वापरण्यापेक्षा झाऱ्याचा वापर करावा. यामुळे पाणी व्यवस्थित हलवलं जात आणि यामुळेच उपम्यात गुठळ्या तयार होत नाहीत.
४. उपमा करण्यासाठी आपण रवा भाजतो. रवा कच्चा राहिला तरीही उपम्यात गाठी किंवा गुठळ्या तयार होतात. त्यामुळे रवा सोनेरी रंगांचा होईपर्यंत चांगला भाजून घ्यावा. भाजलेला रवा जेव्हा आपण फोडणीच्या पाण्यांत घालतो, तेव्हा तो रवा देखील कोमट किंवा गरम असावा. पाणी गरम आणि भाजलेला रवा थंड असेल असं झालं तरीही उपम्यात गाठी किंवा गुठळ्या तयार होतात.
पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...
५. उपमा करताना आपण आधी फोडणी करुन घेतो. त्यानंतर कढईमध्ये पाणी घालतो. काहीजण फोडणीत थंड पाणी घालतात किंवा काहीजण खूपच उकळते पाणी घालतात, असे दोन्ही प्रकार करू नयेत. आपण फोडणीमध्ये जे पाणी घालू ते गरम असावं थंड किंवा उकळत पाणी घातल्याने गुठळ्या तयार होतात.