हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पालक, मेथी, शेपू व इतर पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. त्यामुळे तज्ज्ञ देखील पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. पण पाले भाज्या शिजल्यानंतर त्याचा रंग का बदलतो? याचा विचार आपण कधी केला आहे का?
पालेभाज्या बाजारातून आणल्यानंतर हिरव्या असतात, पण शिजल्यानंतर त्यांचा हिरवा रंग कमी होतो, किंवा भाजी पिवळी दिसते. पालेभाज्यांमधील हिरवा रंग आहे तसा टिकवून ठेवायचा असेल, तर या काही टिप्स फॉलो करून पाहा. या टीप्समुळे पालेभाज्यांमधील हिरवा रंग टिकून राहेल. व भाजी चवीलाही उत्कृष्ट लागेल(How do you protect the color of green vegetables when cooking?).
- सर्वप्रथम भाज्या स्वच्छ धुवून घ्या, व भाज्या उकळून घेतल्यानंतर थंड किंवा बर्फाच्या पाण्यात काहीवेळ घालून ठेवा. यामुळे भाज्यांचा मूळ रंग बदलणार नाही. व कधी - कधी हिरवा रंग आणखी गडद दिसून येऊ शकतो.
नाश्त्याला करा इन्स्टंट रवा ढोकळा, गुजराथी रेसिपी करायला सोपी - पोटभर आणि पौष्टिक
- भाज्या शिजवताना त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगरचा वापर करा. या ट्रिकमुळे भाज्या हिरवेगार दिसेल. भाज्या शिजवताना त्याआधी उकळत्या पाण्यात काही थेंब व्हिनेगरचे घाला. व त्यानंतर त्यात भाज्या घालून शिजवा.
- हिरव्या पालेभाज्यांना बेकिंग सोडासोबत शिजवल्याने पाण्यातील आम्लता कमी होते. ज्यामुळे भाज्यांचा रंग बदलत नाही.
- हिरव्या पालेभाज्या अधिक काळ शिजवू नका. भाज्या फक्त ५ ते ६ मिनिटे शिजवा. यामुळे भाज्यांमधील मूळ रंग बदलणार नाही.
१ वाटीभर भिजलेल्या हरबऱ्याचा पौष्टिक डोसा, वजन कमी करायचं तर नाश्त्याला खा ‘चना डोसा!’
- जेव्हा पालेभाज्यांची खरेदी कराल तेव्हा, फ्रेश भाज्यांची खरेदी करा. फ्रेश भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग बदलत नाही.