Join us  

घरी लावलेले दही खूपच आंबट झाले? पाणी न घालता करा १ युक्ती, दही होईल मस्त चविष्ट-घट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 1:17 PM

How Do You Reduce The Sour Taste in Curd : बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्याघरी दही बनवणं उत्तम म्हणून अनेकजण घरी दही बनवतात पण दही कधी आंबट होतं तर कधी दह्यात जास्त पाणी राहतं.

उन्हाळ्यात लोक वेगवेगळ्या स्वरूपात लोक ताक, दह्याचा आहारात समावेश करतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. लस्सी, ताक असो किंवा दही  गरमीच्या दिवसांत हे पदार्थ खाण्याचा आनंद काही वेगळात. क्रिमी, मलाईदार दही साखर घालून उत्तम लागते. (How Do You Reduce The Sour Taste in Curd) दही वडा किंवा कढी या पदार्थांमध्ये तुम्ही  कढीचा वापर करू शकता. (Kitchen Tips & Hacks)

बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्याघरी दही बनवणं उत्तम म्हणून अनेकजण घरी दही बनवतात पण दही कधी आंबट होत  तर कधी दह्यात जास्त पाणी राहतं. परफेक्ट दही लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. दही आंबट झाले तर काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचं सोपं उत्तर पाहूया. (How To Reduce Sourness Of Curd) दही तुम्ही  बाजारातून आणलेलं असो किंवा घरात फर्मेंट केलेलं दही आंबट होणं स्वाभाविक आहे. असं दही तुम्ही जास्तवेळ ठेवूही शकत नाही कारण त्यातून वास येऊ लागतो.  

1) ताज्या दुधाचा वापर करा

दही आंबट झाल्यास त्यात फ्रेश दुधाचा वापर करा. दूध घातल्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होईल. दूध गरम करून व्यवस्थित थंड करून घ्या. दह्यात गरजेनुसार थंड दूध घाला आणि दही मिसळून घ्या.  ३० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या त्यानंतर फ्रिजमधून बाहेर काढून पुन्हा व्यवस्थित एकजीव करून या दह्याचे सेवन करा. दूध घातल्याने दह्याचा आंबटपणा कमी होईल.

2) मसाल्याचा तडका द्या.

एका पॅनमध्ये थोड तेल किंवा तूप गरम करा. त्यात जीरं हींग, लाल मिरची घालून फुटेपर्यंत फ्राय करून  घ्या. दही फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. त्यानंतर दह्याला फोडणी घालून व्यव्सथित एकजीव करा. वरून चुटकीभर मीठ घाला.

मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ

3) दुधाची साय

दुधाची साय वेगळी काढून थंड करून घ्या दही फ्रिजमधून बाहेर काढा. फ्रेश  दही घेऊन त्याचे सेवन करा किंवा तुम्ही फ्रेश क्रिम दह्यात घालून मिसळू शकता. 

वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल

4) फळं मिसळा

पिकलेली केळी, आंबा, स्ट्रॉबेरी यासांरखी फळं दह्यात मिसळल्याने आंबटपणा वाढेल. याशिवाय संतुलन चांगले राहील. यामुळे फक्त आंबटपणा कमी होणार नाही तर दह्यात फ्लेवरसुद्धा एड होईल. ज्यामुळे पदार्थ अधिकच स्वादीष्ट बनेल.सिजनल किंवा आपली आवडती फळं बारीक कापून घ्या दही फ्रिजमधून बाहेर काढून मिक्स  करा. त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमधून काढून याचा आनंद घ्या.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स