Join us  

हाय - हाय मिरची..चिरल्या-वाटल्यानंतर हातांची आग होते? ६ उपाय, काही मिनिटांत आग होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 4:47 PM

How Do You Stop the Chili Pepper Burn? मिरची चिरल्यानंतर हातांची जळजळ थांबत नाही? ६ उपाय, हातांची आग होते कमी

भारतीय पदार्थ लाल - हिरव्या मिरच्यांपासून अपूर्ण आहे. भारतीय लोकांना चमचमीत पदार्थ खाण्याची सवय असते. झणझणीत भाजी असो किंवा एखादं साधं वरण, पदार्थाला तडका देण्यासाठी मिरची हवीच. भारतात मिरच्या देखील विविध प्रकारचे मिळतात. काही चवीला कमी तिखट लागतात तर, काही झणझणीत. मिरच्या खायला झणझणीत लागतात, पण चिरताना हातांची जळजळ - आग होते.

मिरची चिरलेले हात आपण इतर अवयांवर लावले, तर त्या भागावर देखील जळजळ किंवा आग होतेच. सतत पाण्याने किंवा साबणाने हात धुतल्याने ही आग कमी होत नाही. मिरचीमुळे हातांची होणारी जळजळ कमी करायची असेल तर, या टिप्स फॉलो करून पाहा(How Do You Stop the Chili Pepper Burn?).

एलोवेरा जेल

हिरव्या मिरच्या चिरल्यानंतर होणारी जळजळ कमी करण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करू शकता. यासाठी हातांवर एक चमचा एलोवेरा जेल घ्या, व पाच मिनिटांसाठी जेलने हाताला मसाज करा. या उपायामुळे हातांची जळजळ काही मिनिटात कमी होते.

ना डोक्यावर छप्पर ना पोटाला अन्न, ‘तिचा’ एक निर्णय आणि झाली कोट्यवधींची मालकीण..

पीठ मळून घ्या

मिरचीमुळे होणारी हातातील जळजळ कमी करण्यासाठी आपण पीठ मळू शकता. यामुळे हातांची जळजळ दूर होण्यास मदत होईल. ही ट्रिक नक्कीच आपल्याला मदत करेल.

थंड तेल लावा

हातातील जळजळ दूर करण्यासाठी आपण थंड तेलाचा वापर करू शकता. यासाठी आपण पेपरमिंट ऑइलची मदत घेऊ शकता. हातावर हे तेल घ्या, व काही मिनिटे घासा. यामुळे हाताला थंडावा जाणवेल. व हाताची त्वचाही मॉइश्चरायझ होईल.

प्लास्टिकच्या स्टूलला छिद्र का असते? फक्त सजावटीसाठी की आणखी काही कारण..

दही

मिरची चिरल्यानंतर हातांना दही लावा. हातावर एक चमचा दही घेऊन हात रब करा. थंड दहीमुळे हातांवर होणारी जळजळ कमी होईल. व हात सॉफ्ट होतील.

मिरची कापण्यापूर्वी हातमोजे घाला

मिरच्या कापण्यापूर्वी हातमोजे घालणे उत्तम ठरेल. यामुळे हातांमध्ये जळजळ होण्याची समस्या टाळता येईल. पण मिरची चिरल्यानंतर हातमोजे काढताना काळजी घ्या आणि उलटे काढा.

चॉपिंग बोर्ड वापरा

मिरची कापण्यासाठी चाकूऐवजी चॉपिंग बोर्ड किंवा कात्री वापरणे उत्तम ठरेल. ज्यामुळे हातांमध्ये जळजळ होणार नाही. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स