Join us  

कांदे साठवताना टाळा ४ चुका, कांद्यांना कोंब फुटणार नाही - टिकतील दीर्घकाळ फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 3:19 PM

How do you store onions to keep them fresh longer? कोंब फुटलेले कांदे फेकून द्यावे लागतात, असे होऊ नये म्हणून फॉलो करा ४ टिप्स

स्वयंपाकघरात भाज्यांमधे कशाला महत्त्व असेल तर ते आहे कांद्याला. भाजी, आमटी, पोहा, उपमा, कोशिंबीर, रायता, यासह अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा वापर होतोच. कांद्याची चटणी देखील चवीला भन्नाट लागते. कांदा रडवत जरी असला तरी, पदार्थाची चव वाढवण्यासाठी मदत करते.

पावसाळ्यात कुरकुरीत कांद्याची भजी आपण प्रत्येकाने खाल्लीच असेल. काही लोकं गरजेनुसार बाजारातून कांदे आणतात. तर काही १० ते १५ किलो कांदे आणून घरी साठवून ठेवतात. परंतु, दीर्घकाळ साठवून ठेवल्यानंतर कांद्यांना कोंब फुटते. ते लवकर खराब होतात. अशावेळी कांदा फेकून देण्याऐवजी वेळ येते. कांद्याला लवकर कोंब फुटू नये, म्हणून कोणता उपाय फॉलो करावा पाहूयात(How do you store onions to keep them fresh longer?).

कांद्यांना कोंब फुटू नये म्हणून..

अनेक लोकं कांद्याच्या टोपलीत इतरही भाज्या ठेवतात. जसे की, बटाटे, मिरच्या, लसूण ठेवतात. पण याच चुकीमुळे कांद्यांना कोंब फुटतात. अनेक भाज्यांमध्ये इथिलीन नावाचे रसायन असते. ज्यामुळे कांद्याला कोंब फुटते. अशा परिस्थितीत कांद्याला लवकर कोंब फुटू नये म्हणून त्यात इतर भाज्या ठेवणे टाळा.

ना साखर - ना जास्त मेहनत, रक्षा बंधनानिमित्त भावासाठी खास करा ओल्या नारळाचे पौष्टीक लाडू

पेपर बॅगचा वापर करा

कांदे स्टोर करण्यासाठी पेपर बॅगचा वापर करा. पेपर बॅगमध्ये कांदे साठवून ठेवल्यास ते लवकर खराब होत नाही. पेपर बॅग नेहमी एका थंड हवेशीर ठिकाणी ठेवा. ओलाव्यामुळे अनेकदा कांद्यांना कोंब फुटते. त्यामुळे कांदे पेपर बॅगमध्ये साठवून ठेवा.

फ्रिजमध्ये कांदे ठेऊ नका

कांदे फ्रिजमध्ये साठवून ठेवण्याची चूक करू नका. फ्रिजमध्ये इतरही वस्तू असतात, ज्यामुळे कांद्यांना लवकर कोंब फुटते. अनेक वेळा कांदे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे कांद्यांना कोंब फुटते.

१ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये करू नका स्टोर

कांदा खरेदी करताना विक्रेता प्लास्टिकच्या पिशवीत देतो. बहुतांश वेळी आपण कांदे पिशवीमधून काढायला विसरतो. प्लास्टिकच्या पिशवीत कांदे ठेवल्याने ते लवकर गरम होतात. त्यामुळे त्यांना लवकर कोंब फुटू लागते. म्हणून कांदे प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये स्टोर करून ठेऊ नका.

टॅग्स :कांदाअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स