Lokmat Sakhi >Food > आईस्क्रीम, केकमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला म्हणजे नेमकं काय? शेफ कुणाल कपूर सांगतात, ते काय असतं...

आईस्क्रीम, केकमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला म्हणजे नेमकं काय? शेफ कुणाल कपूर सांगतात, ते काय असतं...

How Dose Vanilla Look Video by Chef Kunal Kapoor : व्हॅनिला आपण सगळ्यांनीच टेस्ट केलेला असतो पण पाहिलेला असतोच असं नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 01:29 PM2022-11-16T13:29:47+5:302022-11-16T13:34:31+5:30

How Dose Vanilla Look Video by Chef Kunal Kapoor : व्हॅनिला आपण सगळ्यांनीच टेस्ट केलेला असतो पण पाहिलेला असतोच असं नाही.

How Dose Vanilla Look Video by Chef Kunal Kapoor : What exactly is vanilla used in ice cream, cake? Chef Kunal Kapoor says, what is it... | आईस्क्रीम, केकमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला म्हणजे नेमकं काय? शेफ कुणाल कपूर सांगतात, ते काय असतं...

आईस्क्रीम, केकमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला म्हणजे नेमकं काय? शेफ कुणाल कपूर सांगतात, ते काय असतं...

Highlightsअनेकांनी इतकी महत्त्वाची आणि वेगळी माहिती शेअर केल्याबद्दल शेफ कुणाल यांचे आभार मानले आहेत. ही पावडरही आपण थेट दूध, शेक, आईस्क्रीम, केक यांमध्ये वापरु शकतो असेही ते सांगतात.

व्हॅनिला आईस्क्रीम, व्हॅनिला केक किंवा अगदी व्हॅनिला फ्लेवरचे दूध आपण खाल्लेले किंवा प्यायलेले असते. अनेकदा घरातही आपण हा इसेन्स काही पदार्थांमध्येही वापरतो. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पिस्ता हे फ्लेवर कशापासून तयार होतात हे साधारणपणे आपल्याला माहित असते, पण व्हॅनिला म्हणजे नेमके काय, हा फ्लेवर कशापासून तयार केला जातो असा प्रश्न आपल्याला कधीतरी पडतो. व्हॅनिला आपण सगळ्यांनीच टेस्ट केलेला असतो पण पाहिलेला असतोच असं नाही. याच प्रश्नाचे उत्तर प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी दिले आहे. कुणाल कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून व्हॅनिला फ्लेवर म्हणजे नेमकं काय असतं ते दाखवलं आहे. (How Dose Vanilla Look Video by Chef Kunal Kapoor). 

कुणाल कायमच आपल्या फॉलोअर्सना एखादी झटपट चविष्ट रेसिपी किंवा कुकींगच्या काही खास ट्रिक्स सांगून खूश करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्सही भरपूर असून ते या पोस्टना  अतिशय चांगला रिस्पॉन्स देत असतात. कुणाल यांनी आताही त्यांनी अशाचप्रकारे एका आगळ्यावेगळ्या गोष्टीविषयी माहिती दिली आहे. व्हॅनिला म्हणजे नेमकं काय ते सांगण्याचा प्रयत्न कुणाल यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केला आहे. तर ही एकप्रकारची खोडासारखी दिसणारी वनस्पती असून ती एका ठराविक पद्धतीने कापल्यानंतर त्यातून एकप्रकारची चॉकलेटी रंगाची पावडर निघते. त्या पावडरपासून व्हॅनिला एक्सट्रॉक्ट आणि व्हॅनिला इसेन्स तयार केला जातो. 

ही पावडरही आपण थेट दूध, शेक, आईस्क्रीम, केक यांमध्ये वापरु शकतो असेही ते सांगतात. इन्स्टाग्रामवर त्यांची ही पोस्ट एका दिवसांत हजारो जणांनी पाहिली असून जवळपास १९ हजारांहून अधिक जणांनी ती लाईक केली आहे. अनेकांनी इतकी महत्त्वाची आणि वेगळी माहिती शेअर केल्याबद्दल शेफ कुणाल यांचे आभार मानले आहेत. तर बऱ्याच जणांनी आपल्याला अनेक दिवसांपासून ही माहिती हवी होती आणि ती कुणाल यांनी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत या पोस्टला प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: How Dose Vanilla Look Video by Chef Kunal Kapoor : What exactly is vanilla used in ice cream, cake? Chef Kunal Kapoor says, what is it...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.