Lokmat Sakhi >Food > Kurkure : चटकदार क्रंची कुरकुरे नेमके कसे तयार केले जातात?

Kurkure : चटकदार क्रंची कुरकुरे नेमके कसे तयार केले जातात?

Kurkure : कुरकुरे इतके आवडतात की कमी खाऊ म्हंटलं तरी एकदा पाकीट उघडलं की खाऊन फस्तच केले जातात. ते बनतात कसे याची कहाणीही मोठी रंजक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 02:48 PM2022-02-25T14:48:39+5:302022-03-03T15:16:01+5:30

Kurkure : कुरकुरे इतके आवडतात की कमी खाऊ म्हंटलं तरी एकदा पाकीट उघडलं की खाऊन फस्तच केले जातात. ते बनतात कसे याची कहाणीही मोठी रंजक आहे.

How exactly are crispy crunchy Kurkure made? | Kurkure : चटकदार क्रंची कुरकुरे नेमके कसे तयार केले जातात?

Kurkure : चटकदार क्रंची कुरकुरे नेमके कसे तयार केले जातात?

Highlightsआपण पाणीपुरीच्या पुऱ्या, वेफर्स, खाकरा, शंकरपाळी हे तळलेले पदार्थ नेहमी खातो. त्याचप्रमाणे कुरकुरे हे देखील एककुरकुरेमध्ये प्लास्टिक असल्याच्या अफवाही पसरतात, पण त्यात काही तथ्य नाही.

कुरकुरे - नुसतं नाव ऐकलं तरी आपल्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहत नाही. बाजारात काही वर्षांपूर्वी कुरकुरे (Kurkure) हा पदार्थ आला आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी पार वेड लावून टाकले. चटपटीत, मसालेदार आणि टॅंगी टेस्ट असणारे हे कुरकुरे लहान मुले तर अगदी आवडीने खाताना दिसतात. लहान मुलांना ते देऊ नयेत अशीही चर्चा होते. त्यात प्लास्टिक असल्याच्या अफवाही पसरतात. पण त्यात काही तथ्य नाही. कुरकुरे हा पदार्थ तयार करण्याची अद्ययावत पध्दत असते. अतिशय उत्तम तंत्रज्ञान वापरुन ते तयार केले जातात (Making of kurkure) . 


(Image : Google)
(Image : Google)

आपण पाणीपुरीच्या पुऱ्या, वेफर्स, खाकरा, शंकरपाळी हे तळलेले पदार्थ नेहमी खातो. त्याचप्रमाणे कुरकुरे हे देखील तळलेल्या पदार्थांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यात कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे जपून खावेत. पण त्यांची चव अशी असते की एकदा पाकीट उघडलं की थांबणं मुश्किल.

कुरकुरे कोणी आणि कधी निर्माण केले?

१९९९ मध्ये भारतात कुरकुरे हा प्रकार अस्तित्वात आला. शशांक लक्ष्मण कुरकुरे हे कुरकुरे कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पेप्सिको इंडिया कंपनीचा एक प्रमुख ब्रँड म्हणून कुरकुरे ओळखले जातात.

(Image : Google)
(Image : Google)

नक्की कशापासून तयार होतात कुरकुरे ?

कॉर्न फ्लोअर, तांदळाचे पीठ, हरभऱ्याचे पीठ आणि मसाले यांपासून कुरकुरे तयार केले जातात. ही सगळी पीठे ठराविक प्रमाणात एकत्र करुन मशीनद्वारे कुरकुऱ्यांची निर्मिती केली जाते. यामध्ये सध्या असंख्य वेगवेगळे फ्लेवर्स उपलब्ध असून बाजारात त्यांना मोठी मागणी आहे. हल्ली घरी कुरकुरे तयार करण्याचाही अनेक जण प्रयत्न करतात. मात्र सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या G2 कंपनीचे उत्कृष्ट कुरकुरे खाऊन पहा. चव आणि दर्जा असा की खाण्याची लज्जतही वाढते. आणि आपलं चमचमीत, चटकदार खाण्याचं क्रेव्हिंगही कमी होते.

Web Title: How exactly are crispy crunchy Kurkure made?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.