Join us  

जेवल्यानंतर कधी कधी उलटीसारखं होतं? मग 'या' ६ सोप्या उपायांनी समस्या होईल कायमची दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 1:38 PM

How to get relief from gas, indigestion : काहीही खाल्लं ते चाऊन बारीक करून खावे. तसे न केल्यास पोटात गॅसची समस्या होऊ शकते. काही लोक अन्न चाऊन खाण्याऐवजी गिळतात आणि त्यामुळे त्यात लाळ मिश्रित होत नाही. यामुळे पचन होत नाही.

ठळक मुद्देऔषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं आलं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पोटाशी संबंधित समस्या कमी करण्याबरोबरच पचन सुधारण्यात देखील मदत करते. अपचन दूर करण्यासाठी साठी दिवसातून एकदा किंवा दोनदा तुळशीच्या पानांसह मधाचे सेवन करू शकता. 

कोणत्याही व्यक्तीला कफ, उलटीचा त्रास होत असेल तर याचं कारण चुकीची लाईफस्टाईल असू शकतं. याशिवाय अनेक शारीरिक समस्यांमुळे अशा त्रासाचा सामना करावा लागतो. गर्भावस्थेत महिलांना सर्वाधिकवेळा असा त्रास  होतो. तर काही लोकांना  जेवल्या जेवल्या उलटीसारखं, मळमळ होतं. दरम्यान व्यक्तीच्या शरीरात संतुलन  ठेवण्यासाठी पित्त, कफ, वात यांची महत्वाची भूमिका असते. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आहारात कफ वाढविणार्‍या गोष्टींचे प्रमाण वाढवले ​​तर त्याच्या पाचन शक्तीस त्रास होतो आणि त्यामुळे अन्न तोंडातून बाहेर येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात वात वाढू लागला, तर अशा व्यक्तीमध्ये नाभीतील वेदना, आवाजाने ढेकर देणे, छातीत दुखणे, मळमळ इत्यादी समस्या उद्भवू शकतात. 

काहीही खाल्लं ते चाऊन बारीक करून खावे. तसे न केल्यास पोटात गॅसची समस्या होऊ शकते. काही लोक अन्न चाऊन खाण्याऐवजी गिळतात आणि त्यामुळे त्यात लाळ मिश्रित होत नाही. यामुळे पचन होत नाही.  नाश्ता न करता थेट दुपारी जेवण करणे म्हणजे दरम्यान अनेक तास असतात. यामुळे गॅस आणि अॅसिडीटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे नाश्ता असो वा जेवण ते वेळेवर करणे गरजेचे आहे. 

याशिवाय जर पित्त वाढलं तर व्यक्तीला डोळ्यांमध्ये जळजळ होण, चक्कर येणं ही लक्षणं दिसू शकतात. शरीरातील कफ वाढल्यामुळे उलटी येणं, जास्त झोप येणं, शरीर खूप भरलेलं वाटणं असे त्रास उद्भवू शकतात. घरगुती उपचारांच्या सहाय्याने आपण उलट्यांचा त्रास देखील दूर करू शकता. आम्ही आपल्याला या लेखाद्वारे जेवल्यानंतर जर उलटी, मळमळ वाटत असेल तर काय करायला हवं याबाबत सांगणार आहोत.

कांद्याचा रस

कांदाच्या रसामध्ये पाणी, कॅलरी, प्रथिने, चरबी, अनसॅच्यूरेटेडस्, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी एसिडस् इत्यादी आढळतात. खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास जाणवत असेल तर कोथिंबिरीचा रस कांद्याच्या रसात मिसळा व त्याचे सेवन करा. असे केल्याने मळमळ होण्याची समस्या दूर होईल. याशिवाय कांद्याच्या रसात आल्याचा रस मिसळा व त्याचे सेवन केल्यासही उलट्या थांबू शकतात. आपण हे मिश्रण दर दिवशी एकदाच खायला हवं.

लवंगांचा वापर

लवंगात सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, फोलेट, नियासिन, मॅग्नेशियम, लोह, ग्लूकोज, ही पोषक तत्व असतात. मळमळ झाल्यास दोन लवंगा चोखल्यास आराम मिळू शकतो. लवंगांशिवाय दालचिनीचा तुकडा चघळणंही फायदेशीर ठरू शकतं. 

जीरं

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि पाचन तंत्राच्या आरोग्यासाठी जीरं हा एक चांगला पर्याय आहे. जिऱ्याच्या वापराने मळमळ किंवा उलट्यांचा त्रास देखील दूर केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत पाण्यात जिरे पूड मिसळा आणि जेवल्यानंतर या पाण्याचे सेवन करा. तुमच्याकडे जीरं असेल  तर भाजून घ्या आणि दळून पावडर बनवून  ठेवा. जेणेकरून रोज वापर करता येईल.

तुळस

शरिरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते. अपचन दूर करण्यासाठी साठी दिवसातून एकदा किंवा दोनदा तुळशीच्या पानांसह मधाचे सेवन करू शकता. 

काळी मिरी

जर तुम्हाला कफ, सर्दी, अपचन या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर रोज मध आणि काळी मिरी एक चमचा घ्या. तुम्हाला एसिडीटी किंवा इतर आजारांची एलर्जी असल्यास उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

आलं

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं आलं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पोटाशी संबंधित समस्या कमी करण्याबरोबरच पचन सुधारण्यात देखील मदत करते. आल्याचे सेवन केल्यास छातीत जळजळ कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स