काही भाज्या आणि फळं यांचा अमुक एक सिझन असतो. ही ठराविक फळं आणि भाज्या त्या - त्या ऋतूमध्येच विकायला येतात. इतर वर्षभर ही फळं आणि भाज्या विकत (How Long Does Food Last in a Freezer) मिळत नाहीत, परंत्तू त्या ठराविक सिझनमध्ये अगदी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. अशावेळी आपण या ठराविक भाज्या आणि फळं एकदाच फार मोठ्या प्रमाणांत विकत (How long can frozen fruit last in the freezer without getting freezer burn or going bad) घेतो आणि फ्रिजरमध्ये पुढील काही महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवतो. जसे की, मटार, मटार फक्त हिवाळ्यातच येतात बाकी वर्षभर आपण स्टोअर करुन ठेवलेलेच मटार खातो. परंतु अशा प्रकारे फ्रोजन करून दीर्घकाळ साठवलेले पदार्थ नेमके कधी पर्यंत खाणे योग्य आहे(How Long Does Food Last in a Freezer).
याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. खरंतर, अशाप्रकारे फ्रोजन करून दीर्घकाळ साठवलेले पदार्थ खाणे कितपत योग्य आहे याबद्दल अधिक माहिती घेऊयात. Divya Gandhi's Diet & Nutrition Clinic च्या डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी onlymyhealth या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनुसार, फ्रोजन करुन ठेवलेले पदार्थ खाणे आणि किती दिवस स्टोअर करुन खाणे याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
फ्रोजन करुन ठेवलेली फळं आणि भाज्या कधीपर्यंत खाणे योग्य आहे ?
आहारतज्ज्ञांच्या मते, फ्रोजन करुन ठेवलेली फळं आणि भाज्या सहसा काही महिने वापरता येतात, याचबरोबर ते खाण्यासाठी सुरक्षित मानले जाते. फ्रोजन करुन ठेवलेली फळं आणि भाज्यांची मुदत संपणे किंवा खराब होणे हे तुम्ही ते कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत ठेवता यावर अवलंबून असते. जर फळं आणि भाज्या फ्रोजन असूनही त्याचा रंग फिकट होत असेल किंवा ते वितळत असेल, तर समजून घ्या की तो आता वापरण्यायोग्य नाही. साधारणपणे, फ्रोजन केलेल्या भाज्या आणि फळे ८ ते १२ महिने चांगले टिकू शकतात. फार जुने फ्रोझन फूड खाणे कधीकधी हानिकारक ठरू शकते.
१ कप दूध-वाटीभर कलिंगड, करा ‘मोहब्बत का शरबत’! उन्हाळ्यातील गारेगार पदार्थ, मुलांनाही आवडेल...
फ्रोजन फळं आणि भाज्या खरोखरच खाण्यायोग्य असतात का ?
अन्न सुरक्षा आणि तपासणी सेवा (USDA) नुसार, गोठवलेले अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक नाही, उलट जर ते योग्यरित्या फ्रोजन केले गेले तर ते पोषक तत्वांनी समृद्ध असू शकते. हे फ्रोजन फूड्स आरोग्यासाठी वाईट नाहीत. जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, फ्रोजन फूड्स कधीकधी ताज्या अन्नपदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक असू शकतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरीही फळे आणि भाज्या व्यवस्थितरित्या योग्य पद्धतीने फ्रोजन करुन ठेवू शकता.
मालवणी पद्धतीची ओल्या काजूची झक्कास उसळ, पाहा अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ...
९०% लोकांना लसूण खाण्याची योग्य पद्धत माहीतच नाही, 'या' पद्धतीने लसूण खाल्ल्यास मिळतील अनेक फायदे...
फ्रोजन फळे आणि भाज्या खाण्याचे तोटे :-
१. खूप जुने दीर्घकाळ फ्रोजन करून ठेवलेली फळे आणि भाज्या खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरु शकते.
२. बरेच दिवस स्टोअर करून ठेवलेले फ्रोजन फूड्स खाल्ल्याने अतिसार, मळमळ आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
३. काहीवेळा फार जुने फ्रोजन अन्नपदार्थ खाल्ल्याने हानिकारक जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात.
४. खूप जुनीं फ्रोजन फळे आणि भाज्या खाल्ल्याने, त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराद्वारे शोषले जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला उलट्या होण्याची आणि कधीकधी अन्नातून विषबाधा होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.