Join us  

बाजारातून विकत आणलेले लादी पाव ताजे आहेत की शिळे हे कसे ओळखाल ? ८ टिप्स, खा ताजे मऊ पाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 1:35 PM

How Long Does Pav Last ? 8 Tips To Keep Pav Fresh : जागतिक वडापाव दिन विशेष : बाजारांतून लादी पाव विकत घेताना ते ताजे आहेत की नाही हे नेमके कसे ओळखावे ? यासाठी काही खास टिप्स...

'पाव' हा अनेक पदार्थांचा सोबती आहे, असे म्हटले जाते. काहीतरी चमचमीत, चटपटीत, मसालेदार खायचं म्हटलं की त्या पदार्थांसोबत 'पाव' (Ladi Pav) हा असतोच. आपल्याकडील वडापाव, मिसळ - पाव, भजी पाव, पाव भाजी, कच्ची दाबेली, मसाला पाव असे काही खास पदार्थ पावाशिवाय खाणे म्हणजे अधुरेच आहे. असे असंख्य पदार्थ आहेत जे पावासोबतच खाल्ले तर चांगले लागतात. हल्ली कामाच्या गडबडीत स्वयंपाक करण्यासाठी वेळ नसला किंवा रोजच चपाती, भाजी खाऊन कंटाळा आला की, आपण सरळ बाहेरून पाव विकत आणून खातो.  

'पाव' हा घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ असतो. घरात पाव उपलब्ध असेल तर झटपट आपण काहीतरी चविष्ट रेसिपी करु शकतो. पाव हा असा पदार्थ आहे की तो एकदा विकत आणला की काहीवेळा तो लगेच खाऊन संपत नाही. काहीवेळा आपण आपल्या गरजेनुसार थोडेच पाव  विकत घेतो. घरात जर जास्त माणसं असतील तर नाईलाजास्तव पावाची एक मोठी लादीच घ्यावी लागते. असे असले तरीही परंतु अनेकदा घरी आणलेल्या या पावाच्या लादीचा एकाचवेळी पूर्ण उपयोग होत नाही. मात्र अशावेळी ते पाव २ ते ३ दिवस तसेच ठेवून शिळे झालेले असतात.अशा शिळ्या झालेल्या पावाचे काही पदार्थ बनवल्यानंतरही त्यांना म्हणावी तशी चव येत नाही. दरम्यान, प्रत्येक वेळी उरलेले शिळे पाव आपण फेकून देतो. वारंवार असे केल्याने पाव व पैसे दोन्ही वाया जातात. असे होऊ नये किंवा पाव खरेदी करताना ते नेमके ताजे आहेत की शिळे हे कसे ओळखावे ? व पाव शिळे होऊ नये म्हणून काय करावे ते पाहूयात(How Long Does Bread Last and How to Tell if It’s Bad?).

लादी पाव विकत घेताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी... 

१. लादी पाव (Ladi Pav) हे शक्यतो बाजारांत वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होतात. पावांच्या आकारानुसार यांचे पॅकेजिंग केलेले असते. जर पावांचा आकार मोठा असेल  तर एका लादीत ६ पाव असतात. जर पावांचा आकार हा लहान असेल तर एका लादीत ८ पाव असतात. हे पाव एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून विकायला ठेवलेले असतात. पावांचे हे पाकीट विकत घेताना त्यावरची पाव बनवण्याची डेट व एक्स्पायरी डेट बघून मगच पाव खरेदी करावेत. 

२. शक्यतो, लादी पाव (Ladi Pav) खरेदी करताना ते बाजारांत मिळतात तसे पॅकिंग केलेले घेणे टाळावे. कारण पॅकिंग केलेले हे पाव कधी बनले असतील हे आपण सांगू शकता नाही. तसेच हे पाव पॅकिंगमध्ये असल्याने ते ताजे आहेत का शिळे हे आपण त्यांना हात लावून खात्री करु शकत नाही. त्यामुळे पॅकेजिंगमधील पाव घेणे टाळावे. 

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

ग्रेव्हीत दही घातल्यानंतर ते फुटू नये म्हणून मास्टर शेफ पंकज भदौरिया सांगतात ३ सोप्या ट्रिक्स...

३. लादी पाव विकत घेताना शक्यतो ते एखाद्या चांगल्या बेकरी मधून खरेदी करावेत. बेकरीमधील पाव हे नेहमी फ्रेश बनवून विकले जातात. तसेच त्यांना पॅकिंग केलेले नसते त्यामुळे ते ताजे आहेत की शिळे हे आपण एकदा चेक करून पाहू शकतो. 

४. पावाचा येणारा सुगंध यावरून तो पाव ताजा आहे का शिळा याचा आपण अंदाज लावू शकतो. 

भेंडी हिरवीगार ताजी राहावी म्हणून ४ सोप्या टिप्स, फ्रिजमध्ये ठेवून भेंडी काळी पडणार नाही-सुकणार नाही...

५. पाव विकत घेताना तो हाताला फारच सुका लागत असेल किंवा त्यातील मॉइश्चर जाऊन तो कोरडा पडला असेल तर असा पाव विकत घेऊ नये. 

६. लादी पाव हा शक्यतो ताजा असेल तरच खाण्यासाठी वापरावा. अन्यथा खाणे टाळावे. 

महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

७. एकदा खाऊन उरलेले लादी पाव आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा अल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून जास्त दिवस नाही परंतु १ ते २ दिवस ताजा ठेवू शकतो. 

८. अधिक उष्णता व ओलाव्याच्या ठिकाणी पाव ठेवू नये यामुळे पावला लगेच बुरशी लागण्याची शक्यता असते. तसेच पावाला जर काळ्या, हिरव्या रंगाची बुरशी लागली असेल तर तो खाऊ नये.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स