Health Tips : फ्रिज आज अशी बाब झाली आहे की, त्याशिवाय बरीच छोटी-मोठी काम होत नाहीत. रात्रीचं शिल्लक राहिलेल्या जेवणापासून, मसाले, फळं, भाज्या, दूध, कोल्ड ड्रिंक्स, पाणी अशा कितीतरी गोष्टी यात ठेवल्या जातात. फ्रिजमध्ये एक कोपरा असतो, ज्याला फ्रीजर म्हटलं जातं. फ्रीजरमध्ये आइस्क्रीमपासून ते फ्रोजन मटार, नॉनव्हेज गोष्टी ठेवल्या जातात. अनेकदा अनेक आवश्यक नसलेल्या किंवा फ्रिजमध्ये न मावलेल्या गोष्टी फ्रिजरमध्ये कोंबल्या जातात.
यूएसडीए म्हणजे यूएस डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरनुसार, कुक्ड फूड २ तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवू नयेत. दोन तासांपेक्षा जास्त ठेवलं तर त्यात मायक्रोब्स आणि बॅक्टेरिया होतात. सध्या फ्रोजन भजी, चीज बाइट्स, स्मायलिसची मोठी क्रेझ आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरतात. पण या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात.
मांस किंवा भाज्यांचे पॅकेट डीफ्रॉस्ट करून फ्रिजरमध्ये फेकू नका. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पदार्थ बाहेर काढून नॉर्मल होऊ देता आणि पुन्हा गोठवण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवता, तेव्हा तुम्ही बॅक्टेरिया वाढण्याला पूर्ण संधी देता. वितळवण्या दरम्यान बॅक्टेरिया रोखण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा फ्रिजमधील गोष्टी त्यातच डिफ्रॉस्ट करा आणि नंतर वापरा. दोन तासांपेक्षा जास्त बाहेरची हवा लागू देऊ नका.
यूएसडीएच्या खाद्य सुरक्षा आणि निरीक्षण सेवेनुसार, फ्रोजन पदार्थ किंवा जेवण तीन ते चार महिन्यांच्या आत खाल्ल्या पाहिजे. कारण त्यानंतर त्यांची गुणवत्ता खराब होते. एक्सपर्टनुसार, जर एखादा पदार्थ सहा महिन्यांपेक्षा जास्त फ्रिजरमध्ये ठेवला असेल तो फेकलेलाच बरा.
जर पदार्थांवर क्रिस्टलसारखं काही जमा झाल्याचं दिसत असेल तर ते पदार्थ खाण्यालायक नाही असं समजा. याला फ्रिजर बर्नड फूड म्हटलं जातं. हे पूर्णपणे खराब होत नाही. पण स्वाद अपेक्षेनुसार नसतात. आणखी एक पदार्थ आहे ज्याला फ्रिजरमधून लवकर लवकर फेकलं पाहिजे. तो पदार्थ म्हणजे आइस क्यूब. त्यातून वास येऊ लागतो.
फ्रिजरमधील अन्न सेफ नाही का?
हे तर स्पष्ट आहे की, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. त्याप्रमाणेच फ्रिजरमध्ये ठेवलेले प्रत्येक पदार्थ नेहमीच खाण्यासाठी सेफ नसतात. फ्रिजर सगळ्या प्रकारचे पदार्थ जास्त काळ सुरक्षित ठेवण्याची एक चांगली पद्धत आहे. पण यात तुमच्या खाण्याची गुणवत्ता कमी होते. पुढच्या वेळी फ्रीजरमध्ये काही ठेवाल तर दोन दिवस आणि महिन्यांची काळजी नक्की घ्या.