इडली, डोसा, उतप्पा हे पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. आणि मुख्य म्हणजे पौष्टिक तर असतातच पण पचायलाही अगदी हलके असतात. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये नाश्त्यासाठी हे पदार्थ आवर्जून केले जातात. काही घरांमध्ये पीठ विकत आणून इडली- डोसा केला जातो तर काही घरांमध्ये घरीच पीठ केलं जातं. आता पीठ करतोच आहाेत तर भरपूर करू आणि मग दररोज कधी इडली, कधी डोसा, कधी उतप्पा असे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ, असा विचार घरातली स्त्री करते (How long you can store dosa idli batter). तुम्हीही असाच विचार करून आठवडाभर हे पीठ पुरवून पुरवून खात असाल तर थांबा. कारण असं करणं तब्येतीसाठी किती हानिकारक ठरू शकतं (Side effects of over-fermentation of idli, dosa batter ), याविषयी डॉक्टर काय सांगत आहेत हे एकदा वाचा...
याविषयी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तामध्ये डॉ. संचारी दास असं म्हणतात की इडलीचं पीठ फ्रिजमध्ये ठेवून दिल्यानंतर ते आंबवण्याची म्हणजेच ferment होण्याची प्रक्रिया थांबते, असं अनेकांना वाटतं. पण ते चुक आहे.
मुलं अभ्यास करताना सारखी चुळबूळ करतात- एकाजागी बसतच नाहीत? ३ सोपे व्यायाम, मुलांची वाढेल एकाग्रता
फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ती प्रकिया मंद स्वरुपात का असेना पण सुरूच असते. त्यामुळे अशा शिळ्या पीठात बॅक्टेरियांची संख्या खूप जास्त वाढते. हे बॅक्टेरिया एवढ्या जास्त प्रमाणात आपल्या पोटात जाणं आरोग्यासाठी धोक्याचं असतं. कारण यामुळे acid reflux, अपचन, स्टमक इन्फेक्शन, फूड पॉईझनिंग असे त्रास होऊ शकतात.
इडलीचं पीठ किती तास खाण्यायोग्य असतं?
आहारतज्ज्ञ गरिमा गोयल याविषयी सांगतात की एकदा केलेलं इडलीचं पीठ २४ तासांच्या आता संपवलं पाहिजे.
रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय?
त्यानंतर ते खाणं म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे. जर पीठ गरजेपेक्षा जास्त आंबट झालं, इडली- डोसा करताना पदार्थाचं टेक्स्चर बदलल्यासारखं जाणवलं, पीठाला खूप आंबट वास येऊ लागला तर ते पीठ आता खाण्यायोग्य राहिलेलं नाही हे समजून घ्यावं.