Lokmat Sakhi >Food > बिर्याणी आणि पुलावासाठी कांदा तळण्याच्या भन्नाट ट्रिक्स सांगतोय शेफ कुणाल कपूर, कांदा करपणे अशक्यच!

बिर्याणी आणि पुलावासाठी कांदा तळण्याच्या भन्नाट ट्रिक्स सांगतोय शेफ कुणाल कपूर, कांदा करपणे अशक्यच!

Delicious biryani: बिर्याणीची चव ठरते, ती तिच्यात वापरण्यात आलेल्या बरिस्तावरून (fried onion for biryani) म्हणजेच तळलेल्या कांद्यावरून... म्हणूनच जेव्हा बिर्याणी बनवायची असेल तेव्हा कांदा परतून घेताना विशेष काळजी घ्या....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 07:35 PM2021-12-20T19:35:57+5:302021-12-20T19:36:47+5:30

Delicious biryani: बिर्याणीची चव ठरते, ती तिच्यात वापरण्यात आलेल्या बरिस्तावरून (fried onion for biryani) म्हणजेच तळलेल्या कांद्यावरून... म्हणूनच जेव्हा बिर्याणी बनवायची असेल तेव्हा कांदा परतून घेताना विशेष काळजी घ्या....

How to make barista, fried onion for biryani? recipe by Chef Kunal Kapoor | बिर्याणी आणि पुलावासाठी कांदा तळण्याच्या भन्नाट ट्रिक्स सांगतोय शेफ कुणाल कपूर, कांदा करपणे अशक्यच!

बिर्याणी आणि पुलावासाठी कांदा तळण्याच्या भन्नाट ट्रिक्स सांगतोय शेफ कुणाल कपूर, कांदा करपणे अशक्यच!

Highlightsबरिस्ता बनविण्यासाठी या काही स्टेप्स फॉलो करा.

बिर्याणी म्हणजे अनेक खवय्यांची पहिली पसंती. त्यात घातलेल्या भाज्या, खमंग तळलेला कांदा, दह्याचा मंद सुवास, झकास मसाले आणि तांदूळाची चव असं सगळं जेव्हा एकत्र येतं, तेव्हा त्या चवीला काही तोड नसते... आपण घरी जेव्हा बिर्याणी करतो, तेव्हा सगळं साहित्य वापरून अगदी मस्त बेत जमवून आणण्याचा प्रयत्न करतो.. पण नेमकं काही तरी हुकतं.. सगळं तर टाकलंय, पण मग काय राहिलं.. हे कळत नाही आणि मग विकतच्या सारखी टेस्ट आपल्या घरच्या बिर्याणीला येत नाही. सगळं टाकून, रेसिपी (food and recipe) व्यवस्थित फॉलो करूनही काही राहिल्यासारखं वाटत असेल तर नक्कीच बिर्याणीसाठी बरिस्ता (How to make barista, fried onion for biryani in marathi) बनविताना आपलं काही चुकत नाही ना, हे एकदा तपासून घ्या.. 

 

बरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा हा बिर्याणीतला अतिशय महत्त्वाचा घटक. बिर्याणीत मसाल्यांचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व आहे बरिस्ता तुम्ही कसा बनवता आणि बिर्याणीमध्ये किती टाकता याला. म्हणूनच बरिस्ता बनविताना थोडी काळजी घ्यावी लागते आणि धीर धरावा लागतो. बरिस्ता बनवताना घाई करून अजिबातच चालत नाही.

 

जर गॅस मोठा करून पटापट कांदा परतून घेण्याचा प्रयत्न केला तर मग कांदा करपतो आणि तो करपलेल्या कांद्याचा जळकट वास सगळ्या बिर्याणीला लागतो. त्यामुळेच बरिस्ता बनविण्यासाठी या काही स्टेप्स फॉलो करा. ही रेसिपी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapoor) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम (instagram) पेजवर शेअर केली आहे. 

 

बिर्याणीसाठी बरिस्ता बनविताना...
Tips for making fried onion for biryani

- सगळ्यात आधी तर कांद्याची दोन्ही बाजूची देठे काढून घ्या.
- यानंतर टरफलं काढून टाका आणि कांदे उभे- उभे चिरून घ्या.
- कांदा बारीक, पातळ चिरावा. म्हणजे मग कांदा तळून झाला की छान कुरकुरीत होतो.
- आता कढईत तेल तापत ठेवा.
- तेल चांगलं तापलं की चिरलेला कांदा तेलात टाकून तळून घ्या.


- यावेळी गॅस मध्यम ठेवा. खूप जास्त मोठा किंवा अगदीच बारीक ठेवून नका.
- कांद्याचा रंग गाेल्डन ब्राऊन दिसू लागला आणि खमंग सुवास येऊ लागला की कांदा तेलातून बाहेर काढा.
- व्यवस्थित तेल निथळून घ्या आणि मग टिश्यू पेपरवर ठेवून कांद्यातलं तेल निघून जाऊ द्या.
- हा कांदा थंड झाला की क्रिस्पी, कुरकुरीत होतो आणि मग बिर्याणीसाठी वापरता येतो. 

 

Web Title: How to make barista, fried onion for biryani? recipe by Chef Kunal Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.